लंकेंच्या प्रचारसभेत दत्ता देशमुखांची आठवण काढत पवारांनी निळवंडे धरणाचा सांगितला ‘तो’ किस्सा

लंकेंच्या प्रचारसभेत दत्ता देशमुखांची आठवण काढत पवारांनी निळवंडे धरणाचा सांगितला ‘तो’ किस्सा

Sharad Pawar spoke on Nilwande Dam : दहा वर्षापासून ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्याबद्दल आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा प्रश्न पडतो या लोकांनी देशासाठी काय केलं? मात्र, काही गोष्टी त्यांनी केल्या आहेत. त्या कोमत्या असतील तर त्या म्हणजे सत्तेचा गैरवापर यांनी केला. ईडी, सीबीआय यांचा मोठा गैरवापर केला आहे. (Ahmednagar LokSabha) या लोकांनी मलाही नोटीस पाठवली होती. (Prajakt Tanpure) ज्या विषयासंबंधी नोटीस पाठवली त्यामध्ये माझा काहीही संबंध नव्हता. त्यानंतर मी ईडी ऑफिसला जाण्याचा निर्णय घेतला तर माझ्याकडे येऊन सांगितल आमच्याकडून चुकून झालं आपण आमच्या ऑफीसला येऊ नका. (Nilesh Lanke) या घटनेची आठवण सांगून पवारांनी या लोकांनी सत्तेचा गैरवाप केला असा थेट आरोप या लोकांवर केला आहे. ते निलेश लंके यांच्या आयोजीत प्रचार सभेत बोलत होते.

 

विरोधकांना त्रास देण्याच काम

यावेळी बोलताना पवारांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सुरेन आणि अरविंद केजरीवाल यांची आठवण सांगितली. झारखंडमध्ये चांगलं काम करणारे सुरेन यांना या लोकांनी खोट्या केसमध्ये अडकवल आणि सुरेन यांना अटक केली. तसंच, देशाच्या राजधानीमध्ये उत्तम काम करणारे अरविंद केजरीवाल यांनाही या सरकारने अटक केली असा थेट आरोप पवारांनी केला आहे. आज देशभरात वातावरण पाहिलं तर विरोधकांना मोठ्या प्रमाणात त्रास देण्याचं काम या सरकारकडून होत आहे असंही पवार यावेळी म्हणाले आहेत.

 

राहुरी तालुका कुणाची जहागिरी नाही! प्राजक्त तनपुरेंचा विरोधकांवर घणाघात

विरोधकांनी विरोध केला

यावेळी बोलताना, नगरमध्ये दुसरी-तिसरी पिढी राजकारणात आली आहे. एकेकाळी हा अहमदनगर जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जायचा. येथे निळवंडे धराणाचा निर्णय झाला. प्रामुख्याने, राहुरी, राहता, संगमनेर, अकोले आणि सिन्नर या तालुक्यांमधील दुष्काळी भाग शेती पाण्याखाली यावी यासाठी आम्ही विचार केला. त्यावेळी येथे निळवंडे हे धरण व्हावे यासठी एक परिषद झाली. त्यावेळी दत्ता देशमुख हे या जिल्ह्याचे मोठे नेते होते. त्यांनी हे धरण व्हावं अशी बाजू मांडली. मात्र, आज जे नगर दक्षिणचे विरोधी उमेदवार आहेत त्यांच्या वाड-वडिलांनी या धरणासाठी विरोध केला होता अशी आठवण पवारांनी यावेळी सांगितली.

 

निलेश लंकेंवर संपत्तीएवढाच कर्जाचा डोंगर; 44 लाख संपत्ती अन् 37 लाखांचं कर्जच!

अनेक व्यावसांवरून विरोधकांवर टीका

आजही अनेक काम झालेली नाहीत. मात्र, यांनी ती पूर्ण न करताच आता हे विरोधक पुन्हा एकदा लोकसभेत जाण्याचा विचार करत आहेत. येथे विजेच्या कंपनिचा प्रश्न आहे. राहुरीचा साखर कारखानाही बंद आहे. काय अवस्था आहे या कारखान्याची असं म्हणत पवारांनी तालुक्यातील अनेक व्यावसांवरून विरोधकांवर टीका केली. तसंच, चांगल्या गोष्टी ज्या सुरू आहेत त्या चालू द्यायच्या नाहीत हे विरोधकांचं काम आहे असा आरोपही पवारांनी यावेळी केला आहे.

 

तुमची भाषा तुमच्याकडे ठेवा

आपण जो उमेदवार दिलाय तो फाटका माणूस आहे. दहा बाय दहाच्या खोलीत राहतो. मात्र, त्यांची सामान्य जनतेशी नाळ जोडलेली आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न समजून घेणारा आणि सोडवणारा माणूस असणं महत्वाचा आहे. तसंच, पवारांनी लोकसभेत कोणत्याही भाषेत बोललं तरी आपण आपल्या भाषेत ऐकू शकतो अशी सोय असल्याची माहिती सांगून तुमची भाषा तुमच्याकडे ठेवा असा टोलाही विरोधकांना लगावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube