Video: मराठा आंदोलकांचा शरद पवारांना थेट प्रश्न? फक्त पाठिंबा नको भूमिका सांगा? पाहा व्हिडिओ
Sharad Pawar on Maratha reservation : सध्या नेत्यांच्या गाड्या अडवण, गाडीवर दगडफेक, सुपारी फेक सुरूच आहे. अशातच आज मराठा आंदोलकांनी शरद पवार यांची गाडी आडवली. यावेळी मराठा आंदोलकांकडून एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली. शरद पवार यांच्या गाडीच्या समोर येऊन काही मराठा आंदोलक घोषणा देत होते. (Sharad Pawar) शरद पवार आज बार्शी दौऱ्यावर आहेत. या वेळी आंदोलकांनी टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर आंदोलकांनी गाडी अडवत शरद पवारांना प्रश्नही विचारले.
video: पुणेकराने थांबवली आमदाराची गाडी; सायरन वाजवला म्हणून झाप झाप झापलं; पाहा व्हिडिओ
टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर आंदोलकांनी गाडी अडवली आहे. शरद पवार यांची गाडी कुर्डूवाडीजवळ अडवून मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. सकाळी 11 वाजता बार्शीत शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा तसंच नव्याने निवडून आलेल्या खासदारांचा सत्कार होणार आहे. त्यानंतर दुपारी 4 पर्यंत पवार हे बार्शीत आहेत. संध्याकाळी सोलापूर शहरातील लिमयेवाडी येथे भटके, विमुक्त, ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आलाय. त्याला ही उपस्थित राहणार आहेत.
मनसेचे तालुका प्रमुख सागर लोकरे आणि मराठा आंदोलकांनी शरद पवारांची गाडी अडवली होती. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी केली. आंदोलकांनी गाडी अडवल्यानंतर पवारांनी कारचा दरवाजा उघडला आणि आंदोलकांचं म्हणणं ऐकलं. त्यानंतर पवारांनी यावेळी माझा पाठींबा आहे, असं म्हणाले. त्यानंतर पवारांची गाडी आंदोलकांनी सोडली. यावेळी मराठा आंदोलकांनी घोषणाही दिल्या.
शेख हसीनांच्या राजवटीचा अंत! कोण आहे नाहिद इस्लाम?, बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाच चेहरा
भाजपा खासदार अशोक चव्हाण यांना एका कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी आरक्षणाबाबत जाब विचारल्याची घटना समोर आली आहे. आरक्षणासाठी तुम्ही काय केलं?, आरक्षण देण्यासाठी इतका वेळ का लागतो असा सवाल आंदोलकाने केला आहे. आमच्या योद्धाची प्रकृती खालावत आहे , आरक्षण वेळेत दिलं तर विधानसभेत तुमच्या सोबत नाही तर तुमच्या विरोधात असं आंदोलकांनी सुनावल. काल रात्री मुगट या गावात कार्यक्रमासाठी अशोक चव्हाण गेले होते. यावेळी हा प्रकार घडला . दरम्यान अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदार संघात सातत्यानं मराठा आंदोलकांकडून चव्हाण कुटुंबीयांचा विरोध होत आहे.
मराठा आंदोलकांकडून एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत शरद पवार यांची गाडी अडवण्यात आली. त्यांना आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करा असं आंदोलक म्हणत आहेत. पवार आज बार्शी दौऱ्यावर आहेत.#SharadPawar #maratha_reservation #ManojJarange pic.twitter.com/bA0nCJdJq3
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 11, 2024