शरद पवारांनी साधला गुरूपौर्णिमेचा मुहूर्त; यशवंतराव चव्हाणांचा आशीर्वाद घेत फुंकलं रणशिंग
NCP : कराड : राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार आहे. राष्ट्रवादीत जे काही झाले त्यासंदर्भात पुन्हा एकदा जनतेच्या न्यायालयात जाणार आहे, असं म्हणतं राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लढाईचे रणशिंग फुंकलं. ते कराड येथील प्रितीसंगममधून बोलत होते. अजित पवार यांच्या बंडानंतर आज गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत शरद पवार यांनी कराड येथे जाऊन दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना समाधीस्थळी अभिवादन केलं. यानंतर त्यांनी आपण लढाऊ बाणा दाखवून दिला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमली होती. (Sharad Pawar were present in Karad at Pritisangam for Gurupornima after Rebellion of Ajit Pawar)
शरद पवार म्हणाले, लोकशाहीत अधिकार जतन करणे गरजेच असून, लोकशाहीत प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे.एकवेळ राज्यातील जनता उपाशी राहिल पण सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. देशात चुकीच्या प्रवृत्ती डोकं वर काढत असून, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यामध्ये नवी पिढी तयार केली. प्रत्येक जिल्ह्यात युवकांचा संच निर्माण केला. त्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास केला. आता सामान्य माणसांचा लोकशाहीचा अधिकार जपला पाहिजे.
NCP Political Crises Live : अजितदादांची चार वाजता पत्रकार परिषद; अन्य नेत्यांना न बोलण्याची तंबी
आमची विचारधारा जातीयवाद आणि जातीयवादाच्या विरोधात आहे. महाराष्ट्रात जातीचे राजकारण चालणार नाही आणि महाराष्ट्राला आपली एकजूट दाखवावी लागेल. निवडून आलेली सरकारे पाडली जात आहेत. समाजात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशभरातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना आणि बंडखोरांना त्यांची जागा दाखवणार आहे. आपल्याला नव्याने सुरुवात करावी लागेल. राष्ट्रवादीत जे काही झाले त्यासंदर्भात पुन्हा एकदा जनतेच्या न्यायालयात जाणार आहे. 5 जुलै रोजी पक्षश्रेष्ठींची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
फडणवीसांच्या खेळीला मोदी-शाहांचा आशीर्वाद नाही? 24 तास झाले तरी…
कराडमधील गर्दी बघून समजेल…
दरम्यान, पवार यांच्या या शक्तीप्रदर्शनावर बोलताना आव्हान म्हणाले, कराडमध्ये जमलेली गर्दी बघून जनसमर्थन कोणाच्या मागे याची कल्पना आली असेल. आजपासून नवीन लढाई सुरू करणार आहे. पवार साहेब आता रस्त्यावर आलेले आहेत. कराडमध्ये जमलेली गर्दी बघून जनसमर्थन कोणाच्या मागे आहे, याची सर्वांनाच कल्पना आली आहे. अजित पवारांनी गद्दारी केली का, या प्रश्नावर बोलताना जितेंद्र आव्हाडांनी टोला लगावला आहे. पवारांनी आपल्या विरोधात सभा घेतली तर काय अशी भीती अजित पवारांसोबत गेलेल्या लोकांना वाटू लागली आहे. कालच पवारांनी सांगितले आहे की, पक्ष, चिन्ह आणि राष्ट्रवादी माझी आहे. गेलेल्या अनेक आमदारांचे आम्हाला फोन येत असल्याचे आव्हाडांनी यावेळी सांगितले.