विरोधकांच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाही, आमदार मोनिका राजळेंचा विरोधकांवर घणाघात
Monika Rajale : ताजनापुर योजनेवर चर्चा सुरु केली की समजून जायचं निवडणूक आली आहे. निवडणूक प्रचारात गावासाठी काय दिलं, काय करणार हे न सांगता, जातीपातीचं राजकारण सुरु करायचं. (Monika Rajale) त्यांच्याकडं विकासकामांचे मुद्दे नसल्याने, विकासाच्या मुद्द्याला बगल द्यायची, दहा वर्षात तालुका मागे पडला म्हणायचा, जर तुम्ही दहा वर्षात मतदारसंघात फिरले असते तर विकास कामे दिसली असती. तुमच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाही असं प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे. त्या प्रचार सभेत बोलत होत्या.
कारखान्याला मदत हवी होती त्यावेळी अजितदादांच्या गटात आले. दिडशे कोटी रुपये निधी मिळाला, लगेच पलटी मारली. त्यांनी देखील यापूर्वी तालुक्याचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांच्या कार्यकाळात बसस्थानक, शहर पाणी योजना, ताजनापुर योजना, रस्ते, आदी प्रश्न होते. इतक्या वर्षापासून महिलांचे पाण्यासाठीचे सुरु असलेले हाल त्यांना दिसले नाहीत. मी महिला असल्याने त्यांचे दुःख वेदना मला जाणवल्या त्यामुळे प्राधान्याने पाणी प्रश्नावर पाठपुरावा करुन पाणी प्रश्न मार्गी लावला असंही त्या म्हणाल्या आहेत.
विकास कामे न करता वेगळ्याच विषयावर विरोधकांचं राजकारण; आमदार मोनिका राजळेंचा हल्लाबोल
बसस्थानक, विविध रस्त्यांचे कामे मार्गी लावली. त्यावेळी त्यांना हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोणीही अडवले नव्हते. प्रत्येक गावात किमान एक कोटी निधी देऊन विविध प्रश्न मार्गी लावले. क्वचित एखाद्या गावाला कोटी पेक्षा कमी निधी मिळाला असेल. पण भेदभाव न करता जनतेचे हित लक्षात घेऊन कामं केल्याचं आमदार मोनिका राजळे म्हणाल्या. त्यांचे सध्या प्रचार दौरे सुरू असून मठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे त्यांचं पार्ड जड होतय असं चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे.
आमदार राजळे यांनी तालुक्यातील ठाकूर निमगाव, कुरुडगाव रावतळे, वरुर, भगुर, आव्हाणे, दिंडेवाडी, बऱ्हाणपुर, मळेगाव, भातकुडगाव, आखतवाडे, आपेगाव, गरडवाडी, ढोर जळगाव, सामानगाव, लोळेगाव आदी गावातील नागरिकांशी संवाद साधला. वरुर येथे झालेल्या कार्यक्रमात दिनकर अंचवले महाराज, भिमराव फुंदे, सचिन म्हस्के, भानुदास सोनटक्के, मारुती लव्हाट, विठ्ठल झिरपे, केशव म्हस्के, गणपत शिंदे, संजय देवडकर, संजय मोरे, बाबासाहेब धायतडक, प्रकाश म्हस्के, भागवत झिरपे, भाऊसाहेब वावरे, किसन म्हस्के, संजय मोरे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.