विकास कामे न करता वेगळ्याच विषयावर विरोधकांचं राजकारण; आमदार मोनिका राजळेंचा हल्लाबोल
Mahayuti candidate Monika Rajale campaign : शेवगावमध्ये महायुतीच्या उमेदवार मोनिका राजळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रिंगणात उतरल्या आहेत. आखेगाव येथे मोनिका राजळे (Monika Rajale) म्हणाल्या की, विकासाचे आणि जनतेच्या कामाचे मुद्दे बाजूला ठेवून ही निवडणूक वेगळ्या वळणार न जाता विकासाच्या मुद्द्यावर गेली पाहिजे. या निवडणुकीत वेगळं चित्र पाहायला मिळतंय. आज जातीपातीचे दबावाचे राजकारण केले जात आहे. कुठं आपला माणूस, आपला तालुका म्हणणाऱ्यांना दहा वर्षात आपली माणसं आठवली नाहीत. परंतु निवडणूक (Assembly Election) लागल्यावर गुणवंतांचा सत्कार करायला लागले, कुस्त्यांचे आखाडे भरवायला लागले, कार्यकर्त्यांना साधा काटा मोडला तरी धावत पळत यायला लागले. हे तात्पुरते प्रेम जनतेने ओळखले पाहिजे. दोन्ही उमेदवार मागील वेळी म्हणायचे ही शेवटची निवडणूक आहे. आता खोटं खोटं डोळ्याला रुमाल लावून डोळे पुसायला लागलेत, तुम्हाला एकच सांगेल, या अपक्षांच्या नादी लागून मत वाया घालू नका असं आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी मतदारांना केलंय.
तालुक्यातील आखेगाव, शिंगोरी, थाटे, वाडगाव, मुर्शतपुर, सालवडगाव, खरडगाव येथे आमदार राजळे यांचा गावभेट सवांद दौरा झाला. यावेळी आखेगाव येथे राजळे बोलत होत्या. यावेळी भाऊसाहेब पायघन, अर्जुन काटे, नानाभाऊ कोल्हे, मारुती पायघन, काकासाहेब खर्चन, त्रिंबक काटे, भगवान काटे, संभाजी काटे, अशोक काकडे, बाबासाहेब गोर्डे, काशिनाथ बोरुडे, कातकडे मेजर, ठबु ससाणे, मनोज पायघन, एकनाथ काटे, सुरेश गोर्डे, ज्ञानेश्वर गोर्डे, आप्पासाहेब काटे आदी सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थीत होते. पुढे बोलतांना राजळे (Mahayuti) म्हणाल्या पंकजा मुंडे यांनी मला जलसंधारण तसेच ग्रामविकासाचा मोठा निधी दिला होता. त्यामुळे विविध गावातील विकासाचे कामे मार्गी लावता आली.
मोनिका राजळे म्हणाल्या की, आज जे जातीच्या नावाने मतं मागत आहेत. त्यांनी नेमके कोणासाठी काय केले, हे जनतेला माहीती आहे. लोकांना सर्व गोष्टी समजतात त्यांना तुम्ही हलक्यात घेऊ नका. काहीजण तर आता आपला तालुका म्हणतात, मग गेल्या दहा वर्षे तुम्ही तालुक्यासाठी काय केले असा प्रश्न उपस्थित करून सोसायटीचे कर्ज देणार नाही, उस कारखान्याला घेतला जाणार नाही, अशी दमदाटी केली जातेय. जनतेची अडवणूक झाली तर मी जनतेसोबत राहील, अशी ग्वाही राजळे यांनी यावेळी दिली. सालवडगाव तसेच शिंगोरी येथील नागरिकांनी विरोधकांचा ताजनापुर योजनेवरुन चांगलाच समाचार घेतला. कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही अपप्रचाराला बळी पडणार नाहीत. तुमच्या खोट्या प्रचाराला मतदानातून उत्तर देऊ असे म्हटले.
अंबानींच्या लग्नात मोदी गेले होते, मी नाही कारण…, राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
निवडणूक आली की, ही मंडळी ताजनापुर योजनेवर खुप राजकारण करतात. मी जबाबदारी पूर्वक सांगते, या दहा वर्षात प्रत्येक बजेटमध्ये या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मागणीनुसार दरवर्षी 30 ते 40 कोटी रुपयाची तरतुद केलीय. 2018 साली ड्रिप इरिगेशनचे सव्वाशे कोटी रुपयांचे टेंडर करुन घेतले आहे. टाकीपर्यंत पाणी आले, चाचणी घेत असताना चापडगाव परिसरातील दोन बंधारे भरुन घेतले. परंतु ज्यांचा काही संबंध नाही ते मंडळी तिथं जाऊन नारळ फोडत आहेत. हा खोटारडे पणा आता नागरिकांनी ओळखला पाहिजे. आखेगावसह तेरा गावांना पाणी देण्यासाठी उपमुख्यमंत्री, जलसंधारण मंत्री यांच्यासोबत बैठक घेतली. तीन आठवड्यात तांत्रिक मान्यता मिळून त्याचा अध्यादेश आला, त्याचंही राजकारण केलं गेलं असं राजळे म्हणाल्या आहेत.