Monika Rajale यांच्या मतदार संघात कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा; गुन्हेगारी विरोधात नागरिकांचा मोर्चा

Monika Rajale यांच्या मतदार संघात कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा; गुन्हेगारी विरोधात नागरिकांचा मोर्चा

Monika Rajale : अहमदनगर जिल्ह्यात विशेषतः भाजप आमदार मोनिका राजळे ( Monika Rajale ) यांच्या मतदारसंघात गुन्हेगारी वाढू लागली आहे. खून, दरोडे आदी घटनांमुळे जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. यातच जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात देखील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षितेतची भावना निर्माण झाली आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात नागरिकांनी पाथर्डी बंद ठेवून पाथर्डी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. पाथर्डी तालुक्यातील वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच लोकप्रतिनिधींचे देखील तालुक्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो आहे.

श्रीरंग बारणे अन् संजोग वाघेरे येणार आमने-सामने; मावळच्या प्रश्नांवर होणार ‘फाईट’

येणाऱ्या काळात निवडणुका असल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून हालचाली सुरु आहे. मात्र पाथर्डी तालुक्यात गेल्या काही महिन्यांमध्ये जबरी चोरी, धाडसी दरोडे, पशुधन चोरी, विद्युत मोटार चोरी, वाहन चोरी, कापूस चोरी, शेळ्या चोरी व जमीन लुटणे, प्लॉट लुटणे, बळजबरीने ताबा घेणे असे प्रकार अलीकडे वाढले आहेत. यावाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक देखील त्रासले आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने जनतेमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

नात्यांची भावनिक गुंतागुंत दाखवणारा Do Aur Do Pyar चा बहुप्रतिक्षित टीझर रिलीज

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी पाथर्डीमध्ये एका व्यक्तीच्या घरावर दरोडा पडला होता. या गुन्ह्यातील आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पाथर्डीकर एकवटले होते, दरम्यान पोलीस प्रशासनाने तातडीने पाऊले उचलत सहा आरोपीना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून इतर काही गुन्हे उघड होऊ शकते याअनुषंगाने आरोपींची चौकशी सुरु आहे अशी माहिती पाथर्डी पोलीस प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान तालुक्यात ठेकेदाराच्या वाटेवरून होत असलेले वाद, गुन्हेगारी यामुळे तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. लोकप्रतिनिधी आमदार मोनिका राजळे यांनी देखील या महत्वाच्या विषयात लक्ष घालावे अशी मागणी नागरिक करत आहे. मात्र लोकप्रतिनिधींकडून केवळ विकास कामाच्या वलग्ना केल्या जात असल्या तरी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज