जय कुमार गोरेंच्या अश्लील फोटो प्रकरणात शिंदेंच्या एका नेत्यालाही अटक; ‘त्या’ महिलेसोबत होते सहभागी

Shinde leader arrested in obscene photo case of Jai Kumar Gore : मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी स्वतःचे नग्न फोटो एका महिलेला सेंड केले असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावरून वादंग उठलेलं असताना या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आल्या नंतर आता पुन्हा शिंदेंच्याच एका नेत्यालाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो आले अन् लगेच..अजित पवारांनी सांगितली मुंडेंच्या राजीनाम्याची गोष्ट
या प्रकरणांमध्ये सातारा पोलिसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांना देखील अटक केले त्यामुळे आता या प्रकरणांमध्ये आणखी राजकीय पदाधिकारी असल्याचे देखील समोर येत आहे. दहिवडी पोलिसांनी त्यांना अटक केली असून खंडणी प्रकरणात संबंधित महिलेसोबत अनिल सुभेदार यांचा देखील सहभाग असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
जयकुमार गोरे यांनी 2017 मध्ये मानसिक त्रास देण्यासाठी स्वतःचे नग्न फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले असा आरोप या महिलेने केला होता. या प्रकरणात गोरे यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्याता आला होता. मात्र 2019 मध्ये या प्रकरणात न्यायालयाने निकाल देत गोरे यांना निर्दोष मुक्त करत जप्त केलेला मुद्देमाल आणि मोबाईल नष्ट करण्याचे आदेश गोरे यांना न्यायालयाने दिले होते.