संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो आले अन् लगेच..अजित पवारांनी सांगितली मुंडेंच्या राजीनाम्याची गोष्ट

Ajit Pawar on Santosh Deshmukh Case : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरूवातीपासूनन लोकांनी माजी मंत्री धनंय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली होती. पुढे त्यांना मंत्रीपद दिल नाही पाहिजे अशीही चर्चा लोक करत होते. दरम्यान, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर अनेकदा त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. (Santosh Deshmukh ) पुढं संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचे फोटो आले आणि अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यावर आता अजित पवार सविस्तर बोलले आहेत.
फोटो व्हायरल
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी, सीआयडी नेमली आहे. आत्तापर्यंत या चौकशीत धनंजय मुंडे यांचे नाव कुठेही आले नसल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ज्यावेळी संतोष देशमुखांना मारहाणीचे फोटो व्हायरल झाले आम्हालाही त्याच्या वेदना झाल्या. त्यानंतर आम्ही सगळे बसलो, त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला.
संतोष देशमुख यांची हत्या झाली, तशी दुसरी घटना पुन्हा;पंकजा मुंडे बीड जिल्ह्याबाबत काय म्हणाल्या?
त्याचबरोबर या प्रकरणामध्ये कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. कोणाचंही चुकीचं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही असं अजित पवार म्हणाले. या काळात आमच्यावरही आरोप झाले की आम्ही हे फोटो अगोदरच पाहिले असती असे. मात्र, आम्ही हे फोटो पाहण्याचा काहीच संबंध नाही. ज्या संस्था काम करतात त्यांना फक्त विश्वास देण आमचं काम असं अस अजित पवार म्हणाले आहेत. ते धनंजय मुंडेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार बोलत होते.
कायद्याचे पालन माझी भूमिका
माझं काम स्टेट फॉरवर्ड असते. बीड असो किंवा पुणे असो चुकीचं वागणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. कायद्याचे पालन सगळ्यांनी करावं अशी माझी भूमिका असल्याचे अजित पवार म्हणाले. छगन भुजबळ यांनी अनेक ठिकाणी काम केलं. विधानसभा, विधानपरिषदेवर काम केलं आहे. त्यांनी राज्यसभेवर जावं असं मला वाटत होतं. छगन भुजबळांना नाराज करण्याचा माझा किंवा पक्षाचा हेतू नव्हता असेही अजित पवार म्हणाले.