मोठी बातमी! विधान परिषदेसाठी चंद्रकांत रघूवंशी शिवसेनेचे उमेदवार

मोठी बातमी! विधान परिषदेसाठी चंद्रकांत रघूवंशी शिवसेनेचे उमेदवार

Chandrakant Raghuvanshi : विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत रघूवंशी (Chandrakant Raghuvanshi) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर 16 मार्च रोजी भाजपने आपल्या तिन्ही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. विधान परिषदेसाठी भाजपकडून (BJP) संजय किणीकर (Sanjay Kinikar) , संदीप जोशी (Sandeep Joshi) आणि दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर आता शिवसेनेकडून देखील चंद्रकांत रघूवंशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान होणार असून उमेदवारांना (Dadarao Keche) 10 मार्च ते 17 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहे. तर 18 मार्च रोजी अर्जांची छाननी होणार आहे. तर 20 मार्च रोजी उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे.

 तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या (NCP) कोअर कमिटीकडून झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddiqui) , संजय दौंड (Sanjay Daund) आणि उमेश पाटील (Umesh Patil) यांना अर्ज भरण्यासाठी कागदपत्रे तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस माजी आमदार जिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेसाठी संधी देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, जिशान सिद्दीकी यांच्या नावाला पक्षांतर्गत विरोध होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून इतर नावांचा विचार करण्यात येत आहे. माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेश पाटील यांनी विधान परिषदेसाठी संधी मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube