शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर; अभिनेता गोविंदासह ‘या’ बड्या नेत्यांचा समावेश

Shiv Sena Star Campaigners : राज्यातील 29 महानगर पालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर या महापालिका

  • Written By: Published:
Shiv Sena Star Campaigners

Shiv Sena Star Campaigners : राज्यातील 29 महानगर पालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर या महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात येत आहे. मतदारांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या रणनीतीवर काम करण्यात येत आहे. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राज्यातील 29 महानगर पालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 जणांचा समावेश करण्यात आला आहे. माजी खासदार आणि बॉलिवूड अभिनेता गोविंदा देखील शिवसेनेच्या उमेदवारांसाठी प्रचार करताना दिसणार आहे. तर दुसरीकडे या यादीत राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे आमदार निलेश राणे यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

राज्यात 29 महानगरपालिकांसाठी (Municipal Corporation Elections) 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर 16 जानेवारी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट (Eknath Shinde) बहुतांश ठिकाणी भाजपसोबत युती करणार आहे. तर काही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.

शिवसेना शिंदे गट “स्टार प्रचारक” यादी

एकनाथ शिंदे (मुख्य नेते व उप-मुख्यमंत्री), रामदास कदम, गजानन कीतीकर, आनंदराव अडसूळ, श्रीरंग बारणे (उपनेते व खासदार), धैर्यशील माने (खासदार), संदीपान भुमरे (खासदार), नरेश म्हस्के (खासदार), श्रीकांत एकनाथ शिंदे (खासदार), रवींद्र वायकर (खासदार) प्रतापराव जाधव (केंद्रीय मंत्री), मिलिंद देवरा (खासदार), निलमताई गोऱ्हे, मिनाताई कांबळी, डॉ. दिपक सावंत (उपनेते व माजी मंत्री), शहाजी बापू पाटील (उपनेते व माजी आमदार), गुलाबराव पाटील (मंत्री), दादा भुसे (उपनेते व मंत्री), राहुल शेवाळे (उपनेते व माजी खासदार), डॉ. मनिषा कायंदे (सचिव व आमदार), उदय सामंत (उपनेते व मंत्री), निलेश राणे (आमदार), शंभूराज देसाई (उपनेते व मंत्री), संजय निरुपम, संजय राठोड (मंत्री), राजू वाघमारे, संजय शिरसाट (मंत्री), भरतशेठ गोगावले (उपनेते व मंत्री), प्रकाश आबिटकर (मंत्री), प्रताप सरनाईक (मंत्री), आशिष जयस्वाल (राज्यमंत्री), योगेश कदम (राज्यमंत्री), दिपक केसरकर, डॉ. ज्योती वाघमारे, पूर्वेश सरनाईक, राहुल लोंढे, अक्षयमहाराज भोसले, समिर काझी, शायना एन.सी. आणि गोविंदा अहुजा (माजी खासदार)

प्रशांत जगतापांचा राजीनामा अन् अजितदादांशी युती; सुप्रिया सुळेंनी दिली A टू Z माहिती

follow us