Shivsena Name And Symbol Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हावर ‘सुप्रीम’ सुनावणी; आज ठाकरेंना दिलासा की धक्का?

Shivsena Name And Symbol Hearing : सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत

Shivsena Name And Symbol Hearing

Shivsena Name And Symbol Hearing : सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमला बागची आणि व्ही मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर ही सुनावणी होणार असल्याने याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ही याचिका दाखल केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला होता.

या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक वेळा सुनावणी पार पडली असून निर्णय अद्याप झालेला नाही. या होणाऱ्या सुनावणीत पुन्हा नवीन तारीख मिळणार की निर्णय होणार याबाबत सध्या तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

या प्रकरणात झालेल्या मागील सुनावणीत (Shivsena Name And Symbol Hearing) सर्वोच्च न्यायालयासमोर ठाकरे गटाकडून जेष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली होती. आज होणाऱ्या सुनावणीपूर्वी संपर्कप्रमुखांच्या बैठकीत बोलताना पक्षाचे मुळ चिन्ह आपल्यालाच मिळेल आणि जर चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल असा विश्वास उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

मागली सुनावणीत युक्तिवाद करताना आमदार म्हणजे पक्ष नव्हे असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी केला होता. तसेच त्यांनी शिंदे गटाला (Eknath Shinde) पक्ष आणि चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला विरोध देखील केला आहे. 31 आमदारांचा ठराव म्हणजे पक्षाचा निर्णय नव्हे आणि आमदारांच्या फुटीला मान्यता दिल्याने पक्षांतर बंदी कायद्यावर प्रश्चचिन्ह उपस्थित होतात असं देखील कपिल सिब्बल म्हणाले होते.

पुणे, नागपूरसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस, यलो अलर्ट जारी

एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये 40 आमदारांसोबत घेत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केले होते. यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. तर निवडणूक आयोगाने देखील त्यांच्या बाजूने निर्णय दिला होता. मात्र या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

follow us