Prakash Ambedkar : शेतातले भांडण नाही, पवांराबराेबरचे सख्य जगजाहीर

Prakash Ambedkar : शेतातले भांडण नाही, पवांराबराेबरचे सख्य जगजाहीर

पुणे ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माझे शेतातले भांडण नाही. शरद पवार यांच्यासोबत शेतातलं भांडण नाही, तर मुद्द्यांचं भांडण आहे. त्यामुळे शरद पवार आमच्या आघाडीसोबत येतील अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्यात शिवशक्ती-भीमशक्तीच्या प्रयाेगाची साेमवारी (दि. 23) घाेषणा करण्यात आली. यावेळी पञकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बाेलत हाेते. याप्रसंगी शिवसेनेचे (ठाकरे गट) उद्धव ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत उपस्थित हाेते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की,  शिवशक्ती-भीमशक्तीच्या प्रयाेगातून उपेक्षितांच्या राजकारणाची सुरुवात व्हावी यासाठी हा प्रयत्न आहे. जिंकणे राजकीय पक्षांच्या हातात नाही, पण उमेदवारी देणे हातात आहे. ईडीच्या माध्यमातून देशातील राजकीय नेतृत्व संपविण्याचा घाट घातला जात आहे.

तर उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस आहे. ज्या स्वप्नाची महाराष्ट्राची जनता वाट पाहात होता. तो क्षण आता आला आहे. प्रथम देशहित लक्षात ठेवून तसेच देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहे. मी शरद पवारांकडे बघत बसलो आणि मला माझ्याच लोकांनी दगा दिला. आता आम्ही वंचित बरोबर जागा वाटप निश्चित करून एकत्र आलो आहोत. या युतीबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर चर्चा करूनच निर्णय घेतला आहे. प्रत्येक पक्ष आपला मित्र पक्ष सांभाळेल. त्यामुळे महाविकास आघाडीचा वंचितला अजिबात विरोध नाही.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube