500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी जरांगेंच्या घरी SIT दाखल; पेनड्राइव्ह ताब्यात घेणार!

SIT arrives at Jarange’s residence मनोज जरांगे पाटील यांच्या घरी 500 कोटीच्या आरोपासंदर्भात एसआयटीचे अधिकारी दाखल झाले.

SIT Arrives At Jarange Residence

SIT arrives at Jarange’s residence in connection Five Hundres crore audio clip case set to seize pen drive : मनोज जरांगे पाटील यांच्या 500 कोटीच्या आरोपासंदर्भात एसआयटीचे अधिकारी मनोज जरांगे पाटील यांच्या घरी दाखल झाले. मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लिप असलेला पेनड्राइव्ह एसआयटीच्या पथकाकडे सुपूर्द केला. यानंतर एसआयटीने पेनड्राइव्ह सील करून पंचनामा केला. तसेच, या प्रक्रियेनंतर मनोज जरांगे यांची सहीही घेण्यात आली.

दुष्काळात वृद्धांना मिळतयं घरपोच पाणी! मराठवाड्यात ग्रामपंचायत शिपायाची समाजसेवा

काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ऑडिओ बॉम्ब टाकला होता यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार असल्याचं जाहीर केलं होतं. मनोज जरांगे पाटील यांनी टाकलेल्या ऑडिओ बॉम्ब संदर्भात चौकशी करण्यासाठी आणि पुरावे ताब्यात घेण्यासाठी एसआयटीचे अधिकारी मनोज जरांगे यांच्या राहत्या घरी अंकुशनगर येथे दाखल झाले आहे.

नेमकं काय घडलं होतं?

काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत एक कथित ऑडिओ क्लिप ऐकवली होती. या क्लिपमधील संभाषणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपकडून 500 कोटी रुपये देण्यात आले आणि ही रक्कम श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून दिल्याचा उल्लेख या कथित ऑडिओ क्लिपमध्ये असल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीसाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्याची घोषणा केली होती.

पुण्यात भीषण अपघात! आयशर टेम्पो बस स्टॉपवरील विद्यार्थ्यांमध्ये घुसला, दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर

दरम्यान, आता मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणात कदम यांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. आपण ऐकलेली ऑडिओ क्लिप कदम यांनीही ऐकली असल्याने एसआयटीने त्यांची चौकशी करावी, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. तसेच, एसआयटीने ऑडिओ क्लिप मागितल्यास ती देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या चौकशीला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.

follow us