…म्हणून अमोल कोल्हेंचा शिवजन्मोत्सवावर बहिष्कार
पुणे : शिवनेरी गडावर भगवा ध्वज असावा, अशी केंद्र आणि राज्य (Central And State Government)सरकारकडं बऱ्याचदा मागणी केली आहे. परंतु आजपर्यंत भगवा ध्वज न लावल्यानं शासकीय शिवजन्मोत्सवावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe)यांनी बहिष्कार टाकलाय.
अमोल कोल्हे म्हणाले की, शिवजयंती साजरी करणारच आहोत, पण किल्ले शिवनेरीच्या शासकीय शिवजन्मोत्सवावर बहिष्कार टाकला आहे. शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावण्याची मागणी बऱ्याचदा राज्य आणि केंद्र सरकारकडं केली होती.
Chandrashekhar Bavankule : गिरीश बापट आजारी… तरी त्यांना प्रचाराला उतरू का?
त्यावर निर्णय न घेतल्यानं आपण आता शिवनेरी गडावर जाणार असून खाली शिवप्रेमींसोबत थांबणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. शिवभक्तांमधून भगवा ध्वज खांद्यावर घेऊन गड चढणार असून कुठल्याच शासकीय कार्यक्रमात सहभागी होणार नाही असं त्यांनी सांगितलंय.
आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती (दि.19) आग्रा किल्ल्यातील दिवाण- ए- आममध्ये साजरी करण्यासाठी अखेर पुरातत्व विभागानं मंजूरी दिली आहे. त्यामुळं आग्रा येथे ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष घुमणारंय. यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आग्रा किल्ल्यात मोठ्या उत्साहात साजरी होणार असल्याची माहिती अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिलीय.