नगरमध्ये आघाडीत बिघाडी? एकला चलोरेचा नारा देत काँग्रेस आमदाराची थोरातांसमोर निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी
Ahilyanagar Congress ने आगामी निवडणूक स्वबळावर लढवी असं ठाम मत नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनी मांडले आहे.
split in alliance in the Ahilyanagar Congress MLA demands Thorat to contest the elections on his own : येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार पडणार आहे. आता त्यापूर्वीच महायुती व महाविकास आघाडी कडून जोरदार तयारी सुरू असतानाच महाविकास आघाडीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेसने स्वबळावरती निवडणूक लढवावी. काँग्रेस पक्षाला मोठे विचारधारा असून हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. त्यामुळे आगामी निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवावी अशी जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची भावना आहे असं ठाम मत नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनी मांडले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन; मोहोळ, शेलारांसह नेत्यांकडून स्वागत
येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक आहे पार पडणार आहे आता राज्यभरात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना असणार आहे मात्र अनेक ठिकाणी अद्यापही महायुतीमधील तसेच महाविकास आघाडी मधील घटक पक्ष हे स्वतंत्र व स्वबळावरती निवडणुका लढवाव्यात अशी मागणी व त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी तसेच नेतेमंडळी करू लागले आहे. अशीच काहीशी मागणी आता अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेस मधून देखील होत आहे. नगर जिल्ह्यातून देखील काँग्रेसने स्वबळावरती निवडणुका लढवाव्यात अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केले जात आहे.
अमित शाहंनी चंद्रकांत पाटलांकडून…, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होण्यामागचा नेमका घटनाक्रम काय?
दरम्यान संगमनेर येथे पहिले नगर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार हेमंत ओगले करण ससाने यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आले तसेच कार्यकर्त्यांच्या भावना देखील वरिष्ठांनी जाणून घेतल्या निवडणुकांमध्ये रणनीती कशी असावी तसेच आघाडी म्हणून निवडणुका लढवाव्यात की स्वतंत्र याबाबत देखील यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मांडल्या.
मोठी बातमी! अखेर गोखले बिल्डरकडून जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द; म्हणाले, नैतिकतेच्या…
यावेळी श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार हेमंत उगले म्हणाले काँग्रेस पक्षाला मोठी विचारधारा असून तो सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष अशी काँग्रेसची ओळख आहे आता मी काळात जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुका असून यामध्ये काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना मोठी संधी आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी देखील कार्यकर्ते मोठ्या उत्साहात असून त्यामुळे या निवडणुका पक्षाने स्वबळावर लढवाव्यात अशी जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. मात्र मात्र आमचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात याबाबत कार्यकर्त्यांनी भावना या व्यक्त केलेले आहेत दरम्यान यावरती थोरात यांच्याकडून कुठल्याही प्रकार ची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही तसेच थोरात व वरिष्ठ जो निर्णय घेतील तोच आम्हाला मान्य असेल असेही मत यावेळी आमदार हेमंत ओगले यांनी व्यक्त केले.
आम्ही टोकाची भूमिका घेण्याच्या आधी… जैन बोर्डिंग प्रकरणी राजू शेट्टी यांनीही दिला मोहोळांना इशारा
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला गवित यश मिळाले मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले त्यानंतर होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता राजकीय पक्षांनी सावधगिरीने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे यातच काँग्रेस पक्षाने नगर जिल्ह्यातून स्वबळाचा नारा दिल्याने नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणार की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान वरिष्ठ नेते यावरती काय निर्णय घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
