अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा; आर्थिक मदत केली जाहीर
जानेवारी ते मार्च २०२६ मध्ये अवकाळी पावसामुळे एकूण १,४५,६०६ हेक्टरखालील शेतीचे नुकसान झाले आहे.
राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान (Farmer) झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे उभे पिके जमीनदोस्त झाले होते. ज्यानंतर कोलमडलेल्या शेतकऱ्याने राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. तर विरोधकांनी देखील शेतकऱ्यांची बाजू लावून धरत बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची द्यावी अशी मागणी केली होती.
यानंतर आज मंगळवारी (ता.७) झालेल्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत जाहीर केली. त्याशिवाय जानेवारीपासून झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू करावी. त्यांना एनडीआरएफच्या तरतुदीनुसार नुकसान भरपाई देण्यासाठी तातडीने कारवाई करावी असेही आदेश देण्यात आले आहे. दरम्यान राज्यात १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची मदत केली जाणार आहे.
साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपला, मराठवाड्यात २.५९ कोटी क्विंटल साखरेचे उत्पादन
राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचे सुमारे १ लाख १४ हजार ७५२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. यामुळे १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना फटका बसला होता. तर शेती आणि शेतीमालाचे नुकसान झाले होते. याच नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना सरकारने २८.८६ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. याचा प्रामुख्याने चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.
दरम्यान जानेवारी ते मार्च २०२६ मध्ये अवकाळी पावसामुळे एकूण १,४५,६०६ हेक्टरखालील शेतीचे नुकसान झाले आहे. तर २ लाख ३३ हजार ८९० शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला असून केळी, कांदा, पपई, आंबा, द्राक्षे, गहू, हरभरा, ज्वारी इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर जानेवारी ते मार्च २०२६ मध्ये अवकाळीचा लातूर, सोलापूर, नाशिक, सातारा, धुळे, नंदूरबार, यवतमाळ, अहिल्यानगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजी नगर, बुलढाणा आणि बीड जिल्ह्यांना फटका बसला आहे.
यावेळी पाच लोकांचा मृत्यु झाला तर नऊ लोक जखमी झाले आणि ३६ जनावरे दगावली आहेत. तसंच एप्रिलमध्ये देखील अवकाळीने राज्यातील शेतकऱ्यांना फटका दिला असून तब्बल १ लाख ९४ हजार ३२९ शेतकऱ्यांच्या १ लाख २२ हजार ९९३ हेक्टर क्षेत्राचे प्राथमिक अंदाजानुसार नुकसान झाले आहे. दरम्यान आता जानेवारीपासून झालेल्या अवकाळी पावसाने नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे.
1. शेतकऱ्यांना किती मदत जाहीर करण्यात आली आहे?
128 कोटी 65 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे
2. किती शेतकरी या मदतीस पात्र आहेत?
सुमारे 1 लाख 80 हजार 574 शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे
3. ही मदत कशासाठी देण्यात आली आहे?
अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी
4. नुकसान कोणत्या कालावधीत झाले?
ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यान
5. पुढील प्रक्रिया काय आहे?
जानेवारीपासून झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून पुढील मदत दिली जाईल