Maharashtra Rain Alert : विजांच्या कडकडाटासह आज नाशिक, परभणीसह ‘या’ जिल्ह्यात वादळी पाऊस

Maharashtra Rain Alert :  ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार तर काही भागात रिमझिम पाऊस पाहायला मिळत आहे.

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert :  ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार तर काही भागात रिमझिम पाऊस पाहायला मिळत आहे. मात्र आता मराठवाडा, कोकोण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आज नाशिक, जळगावासह इतर काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज जळगाव, नाशिक (Nashik) , परभणी, हिंगोली, नांदेड (Nanded) आणि लातूर जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच काही भागात जोरदार वारे देखील वाहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित भागांसह कोकणात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

तर देशातील अनेक राज्यात सध्या एल निनोचं संकटामुळे पावसावर परिणाम जाणवत असल्याने अनेक ठिकाणी आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती देखील हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

भारताला मोठा धक्का; ट्रम्प लावणार 100 % टॅरिफ; रशियातून येणाऱ्या ‘या’ वस्तू होणार महाग

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या परिसरात समुद्रसपाटीपासून सुमारे 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे आणि या प्रणालीच्या प्रभावामुळे पिश्चिम बंगालच्या किनारपट्टीलगत आज कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. या प्रणालीच्या पुढील हालचालींवर महाराष्ट्रातील पुढील पावसाचे चित्र अवलंबून राहणार असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

follow us