LIVE – सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांकडे राज्याचं उपमुख्यमंत्रिपद सोपवलं जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

  • Written By: Published:
WhatsApp Image 2026 01 31 At 2.27.30 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निधन झाल्यानंतर त्याचा उत्तराधिकारी कोण यासंदर्भात चर्चा सुरु असतानाच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांकडे त्यांचं उपमुख्यमंत्रिपद सोपवलं जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. अजित पवारांच्या अस्थी विसर्जनानंतर सुनेत्रा पवार त्यांच्या दोन्ही मुलांसहीत रात्रीच मुंबईला रवाना झाल्या असून आज मुंबईमधील घडामोडींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. या राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील महत्त्वाच्या अपडेट्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता…

LIVE NEWS & UPDATES

  • 31 Jan 2026 05:21 PM (IST)

    सुनेत्रा पवार यांच्या नावावर नवा विक्रम

    सुनेत्रा पवार यांच्या नावावर नवा विक्रम

    सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्यांच्या नावावर एक मोठा विक्रम झाला आहे. त्या महाराष्ट्राच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. या आधी कोणत्याही महिलेने या पदावर काम केलेलं नाही. पवार घराण्याचा राजकीय वारसा पुढे चालवण्याचे काम आता त्या करणार आहेत. संपूर्ण राज्यातून उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्याची मागणी करण्यात येत होती, त्यानंतर आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं होतं.

  • 31 Jan 2026 05:07 PM (IST)

    सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

    सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

    सुनेत्रा पवार शपथविधीनंतर बारामतीला जाणार

    10 दिवस बारामतीतच करणार मुक्काम

  • 31 Jan 2026 04:59 PM (IST)

    सुनेत्रा पवार यांचा थोड्याच वेळात शपथविधी

    सुनेत्रा पवार यांचा थोड्याच वेळात शपथविधी

    सुनेत्रा पवार शपथविधीनंतर बारामतीला जाणार

    10 दिवस बारामतीतच करणार मुक्काम

  • 31 Jan 2026 03:49 PM (IST)

    शरद पवार सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला जाणार नााही

    सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदासाठी होणाऱ्या शपथविधीला ज्येष्ठ नेते शरद पवार हजर राहणार नसल्याची माहिती कर्जत - जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.

  • 31 Jan 2026 03:46 PM (IST)

    सुनेत्रा पवारांची एकमताने गटनेतापदी निवड; राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

    राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांचं मंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

    सुनेत्रा पवार देवगिरी बंगल्यावर दाखल

    सुनेत्रा पवार यांची एकमताने गटनेतापदी निवड झाली आहे.

    आज सायंकाळी पाच वाजता त्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

  • 31 Jan 2026 03:19 PM (IST)

    सायंकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी, राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

    सायंकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

    राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना वेग

    राष्ट्रवादीचे नेते वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेणार भेट

    त्यानंतर होणार उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी

  • 31 Jan 2026 03:12 PM (IST)

    सुनेत्रा पवारांनी खासदारकीचा राजीनामा दिला

    उपमुख्यमंत्री पदाची शपथघेण्यापूर्वी सुनेत्रा पवारांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्या राज्यसभेच्या खासदार होत्या.

     

     

  • 31 Jan 2026 03:11 PM (IST)

    महाराष्ट्र लोकभवनच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढला

    महाराष्ट्र लोकभवनच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढला

    शासकीय अधिकारीही मोठ्या संख्येनं उपस्थित

    आज सायंकाळी 5 वजता सुनेत्रा पवार घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

    राजभवनातील हाॅलमध्ये होणार शपथवीधीचा कार्यक्रम

    पोलिसांकडून प्रत्येक वाहनांची कडक तपासणी

  • 31 Jan 2026 02:55 PM (IST)

    अजितदादा गेल्यानंतर थपथविधीची इतकी घाई का?- अंजली दमानिया

    अजितदादा गेल्यानंतर थपथविधीची इतकी घाई का? यामागे कुणाचं राजकीय हीत दडलंय. तटकरे, भूजबळ, पटेल, जयंत पाटील हे कधीही भाजपवासी व्हायला तयार आहेत. राष्ट्रवादी संपवली जातेय. यानंतर शिवसेनेलाही दाबलं जाईल. भाजप राज्यातून सगळे प्रादेशिक पक्ष संपवण्याचा कट आखतोय. काही काळात राष्ट्रवादी आणि शिवसेनेला भाजप संपवणार. वित्त खातं देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे का ठेवत आहेत? फडणवीस काय सुपरमॅन आहेत का? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.

  • 31 Jan 2026 02:51 PM (IST)

    पवार कुटुंब एकत्र यावं – आमश्या पाडवी

    पवार कुटुंब एकत्र यावं शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांची भावना.  कधीही परिवारात तुकडे नाही व्हायला पाहिजे या मताचा मी आहे. उपमुख्यमंत्रीपदासाठी पवार कुटुंबातून सुनेत्रा पवार यांचं नाव समोर येत असल्याने आनंद वाटत आहे असं आमश्या पाडवी यांनी म्हटलं आहे.

follow us