Supreme Court : मोठी बातमी ! ठाकरे गटाला झटका; पाच न्यायमूर्तींचे घटनापीठच करणार सुनावणी

Supreme Court : मोठी बातमी ! ठाकरे गटाला झटका; पाच न्यायमूर्तींचे घटनापीठच करणार सुनावणी

Supreme Court on Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर (Supreme Court)आज चौथ्या दिवशी सुनावणी न होता निकालाचे वाचन करण्यात आले. आज सकाळी साडेदहा वाजता दोन्ही गटाचे वकिल न्यायालयात हजर होते. ठाकरे गटाने हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे जावे, अशी मागणी केली होती. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने ठाकरे गटाची मागणी नाकारली आहे. पुढील सुनावणी २१, २२ फेब्रुवारीला होणार आहे.

या प्रकरणी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासह न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी. नरसिंहा पाच न्यायमूर्तींनी ही सुनावणी (Eknath Shinde VS Uddhav Thackeray hearing in Supreme Court) पूर्ण केली हाती. या न्यायमूर्तींच्या घटनापीठाने आज सकाळी हा निकाल दिला. ठाकरे गटाचे कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांच्यासह पाच विधिज्ञ हजर होते. तर शिंदे गटाकडून हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी, मनिंदरसिंग यांच्यासह १० वकिल उपस्थित होते.

हेही वाचा : Supreme Court : लोकांना विकत घेऊन मविआ सरकार पाडले : कपिल सिब्बल

राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयातील (Eknath Shinde ) गुरुवारी  पूर्ण झाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी सविस्तर आणि मुद्देसूद युक्तिवाद गेले तीन दिवस केला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दोन्ही बाजूंच्या वकिलांना अनेक प्रश्न विचारत त्यांची बाजू समजावून घेतली. या सुनावणीत नबाम रेबिया या प्रकरणाचा वारंवार उल्लेख झाला. या प्रकरणानुसार सर्वोच्च न्यायालय पुन्हा विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे सूत्रे देण्यासाठीचे काटे मागे फिरवणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १४ आमदारांना अपात्र ठरवणार किंवा शिंदे यांची खुर्ची अबाधित ठेवण्याचा निर्णय घेणार याची आता उत्सुकता होती.

सुनावणीत मागील तीन दिवसात विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, आमदारांची अपात्रता, पक्षांतर बंदी कायदा, राज्यघटनेतील दहावे परिशिष्ट या मुद्द्यांवर दोन्ही गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. नबाम रेबिया प्रकरणाचाही सुनावणीदरम्यान वारंवार दाखला देण्यात आला. नबाम रेबिया प्रकरणाच्या निकालाचा पुनर्विचार करण्यासाठी हे प्रकरण सात न्यायमूर्तीच्या घटनापीठाकडे वर्ग करावे, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. मात्र, ही मागणी मान्य झाली नाही. सध्याचेच घटनापीठ या प्रकरणी पुढील सुनावणी २१ व २२ फेब्रुवारी रोजी करणार आहे.

आता या मुद्द्यांवर होणार सुनावणी

आता २१ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता पुन्हा पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. यावेळी नबाम रेबिया प्रकरणाव्यतिरिक्त विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण, पक्षांतर बंदी कायदा, राज्यघटनेतील दहाव्या परिशिष्टाची व्याप्ती मुद्द्यांवर पुन्हा युक्तिवाद करण्यात येणार आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube