मोठी बातमी : विधानसभेच्या तोंडावर पवारांना मोठा धक्का; अजितदादांच्या हातीच राहणार ‘घड्याळ’

  • Written By: Published:
मोठी बातमी : विधानसभेच्या तोंडावर पवारांना मोठा धक्का; अजितदादांच्या हातीच राहणार ‘घड्याळ’

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर अजित पवारांना (Ajit Pawar) सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळचं राहणार आहे.  पवार गटाने दाखल केलेल्या चिन्हाबाबातच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने वरील निर्देश दिले आहे. कोर्टाचा हा निकाल अजितदादांसाठी दिलासा तर, शरद पवारांसाठी (Sharad Pawar) मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवार गटाची चिन्हाबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाचं चिन्ह ‘घड्याळ’च राहणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. (Supreme Court Reject Sharad Pawar Plea On Watch Symbol )

मोठी बातमी : पुण्यात राजकीय ड्रामा; बंडखोरी करणाऱ्या बालवडकरांच्या मेव्हण्यावर IT चा छापा

याचिकेत चिन्ह गोठवण्याची केली होती मागणी

महाराष्ट्रातील निवडणुकीच्या आधी घड्याळ चिन्ह गोठवावं. हे चिन्ह अजित पवार यांच्या पक्षाला घड्याळा ऐवजी दुसरं चिन्ह देण्याची मागणी शरद पवार यांच्या वतीने करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट या याचिकेवर निर्णय होण्याच्या प्रतिक्षेत होता अखेर आज (दि. 22) यावर निकाल देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले. या निर्णयाला पवार गटाकडून याचिका दाखल करत आव्हान देण्यात आले होते.

निलेश राणेंचा अखेर भाजपला रामराम; हाती घेतलं ‘शिवधनुष्य’

पिपाणी हटवण्याची मागणी अमान्य

निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या घोषणा करताना शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काही दिवसांपूर्वी पक्ष चिन्हातील तुतारी वाजवणारा माणूस लहान आणि अस्पष्ट दिसतो तर त्याचा आकार वाढवण्यात यावा अशी मागणी आयोगाकडे केली होती. पवारांची ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली होती. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत EVM मशीनवर तुतारी वाजवणारा माणूस स्पष्टपणे आणि मोठा दिसणार आहे. मात्र, आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी पिपाणी या चिन्हावर बंदी घालावी अशी मागणी केली होती.  ही मागणी आयोगाने फेटाळून लावली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्येदेखील पिपाणी चिन्ह अपक्ष उमेदवारांना मिळणार आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला फटका बसणार का? याबाबत आता अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube