मोठी बातमी : पुण्यात राजकीय ड्रामा; बंडखोरी करणाऱ्या बालवडकरांच्या मेव्हण्यावर IT चा छापा
पुणे : विधानसभा मतदानाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे. तसंतसे राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, कोथरूडचे माजी नगरसेवक आणि भाजप नेते अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांनी बंडखोरी करत चंद्रकांतदादा पाटील यांच्याविरोधात बंड पुकारले आहे. मात्र, आता बालवडकर यांचे बंड त्यांचे मेव्हणे आणि महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी असलेल्या अभिजीत कटके यांच्यावर आयकर विभागाने छापेमारी केल्याचे वृत्त समोर आले आहे. वाघोली परिसरात असणाऱ्या कटकेवाडी येथील घरावर ही कारवाई करण्यात आली आहे. ही छापेमारी नेमकी कोणत्या कारणास्तव करण्यात आली आहे याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, मध्यंतरी बालवडकर यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यामुळे भाजपमध्ये लोकशाही धोक्यात आली असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर अशा प्रकारची छापेमारी करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Income Tax Department Raid On Maharashtra Kesari & Hindkesari Wrestler Abhijit Katkes Home)
दुभंगलेल्या बालेकिल्ल्यात शिवसेनेत होणार मुख्य लढत; छत्रपती संभाजीनगर शहरात कोण बाजी मारणार?
अभिजीत कटके बालवडकरांचे सख्खे मेव्हणे
आयकर विभागाचे छापे टाकण्यात आलेले महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी असलेले अभिजीत कटके हे भाजप नेते अमोल बालवडकर यांचे सख्खे मेव्हणे असून, चंद्रकांतदादा पाटील यांच्याविरोधात बालवडकर यांनी शड्डू ठोकल्यानेच विधानसभेच्या तोंडावर हा राजकीय ड्रामा करण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कटके यांच्यावर ही छापेमारी नेमक्या कोणत्या प्रकरणातून करण्यात आली आहे. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नसून, आता बालवडकर नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कोथरूडमधून इच्छुक होते बालवडकर
अमोल बालवडकर हे कोथरूड मतदारसंघातून विधानसभा लढवण्यास इच्छुक होते. परंतु, भाजपच्या पहिल्या यादीत कोथरूडमधून चंद्रकांतदादा पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे आता बालवडकर नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुण्यातील मतदान केंद्रांत वाढ करा; जिल्हा निवडणूक विभागाचे केंद्रीय आयोगाला पत्र
तिकीट द्या, अथवा नाही, पण अशी वागणूक नकोय…
मागील 10 वर्षांपासून मी ज्या पक्षात काम करीत आहे, त्या पक्षातून मला दोन महिन्यांपासून बहिष्कृत करण्यात येत आहे. भाजपचे काही नेते माझ्या कार्यक्रमाला येत नाहीत, माझ्या कार्यक्रमाला जायंच नाही, अशी तंबीही देण्यात येत आहे. या नेत्यांबद्दल आदर होता पण आता तो आदर निघून गेलायं, मला तिकीट द्या अथवा नका देऊ पण अशी वागणूक देऊ नका, असंही अमोल बालवडकर म्हणाले होते.
निवडणूक लढवण्यासाठी गिरीश बापट यांच्या मतदारसंघात देखील कार्यकर्ते इच्छुक होते, पण त्यांना अशी वागणूक कधी मिळाली नाही पण मला अशी वागणूक का दिली जातं आहे? तुम्हाला अहंकार आला आहे. भाजपची लोकशाही संपवण्याच काम पुण्यात केलं जातं असून याचा मी निषेध करतो, आता पक्षाच्या झालेल्या सर्व्हेला मी किंमत देत नाही, अन्याय पक्षाकडून होत नाही, अन्याय एका व्यक्तीकडून होत असल्याचंही बालवडकरांनी सांगितलंय.
ठाकरे गटाला भगदाड! शिरूरमध्ये अशोक पवारांविरोधात अजितदादांना सापडला तगडा उमेदवार
बावनकुळे अन् बालवडकरांची भेट
भाजपची पहिली यादी जाहीर होण्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे शहरातील कसबा, पर्वती, खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर, वडगाव शेरी आणि कोथरूड या सर्वच मतदारसंघांमधील इच्छुकांची नाराजी दूर करण्यासाठी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी सर्वच मतदारसंघातील इच्छुकांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वात सेफ मतदारसंघ असलेल्या कोथरूड मतदारसंघातील इच्छुक अमोल बालवडकर यांची समजूत काढण्यासाठी स्वतः बावनकुळे हे बालवडकर यांच्या घरी गेले होते. मात्र, त्यानंतरही बालवडकर यांची नाराजी दूर करण्यास बावनकुळे यांना यश आले नसल्याचे सांगितलं जातयं.
या भेटीबाबत बालवडकर यांना विचारले असता बालवडकर म्हणाले, ‘बावनकुळे साहेब माझ्या घरी आले होते हे खरं आहे. त्यांनी माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र, मी त्यांना उमेदवारी मागितली त्यांनी याबाबत विचार करू, असं मला आश्वासन दिलं. मी अजूनही आशावादी आहे. मला विधानसभा निवडणूक लढवायची आहे’, अशी प्रतिक्रिया बालवडकर यांनी लेट्सअप मराठीला दिली.
घरावर पडलेली धाड चिंतेची गोष्ट – बालवडकर
मेव्हणे आणि हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी असलेल्या अभिजीत कटके यांच्या घरावरील धाडीवर अमोल बालवडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आज सकाळी माझे मेहुणे हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी असलेले अभिजीत कटके यांच्या घरावर इन्कम टॅक्सची झाड पडली. मात्र, महाराष्ट्राच आणि देशाचं नाव ज्याने उंचावले त्याच्या घरी छापा पडणं हे आमच्यासाठी चिंतेची गोष्ट आहे. अभिजीत यांचे कोणतेही चुकीचे व्यवसाय नसतानादेखील अशा प्रकारची कारवाई करण्यात आली हे आश्चर्य आहे. कटके केवळ माझा मेव्हणा आहे म्हणून त्यांच्या घरावर धाड पडली का?, असा सवाल देखील मनात उपस्थित झाल्याचे बालवडकर यांनी म्हटले आहे.
आयकर विभागाचे छापे टाकण्यात आलेले महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी असलेले अभिजीत कटके हे भाजप नेते अमोल बालवडकर यांचे सख्खे मेव्हणे आहेत. #AmolBalwadkar #Pune #MaharashtraAssemblyElection #BJP #chandrakantpatil @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/EQ2rsLFQJ0
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) October 22, 2024