शरद पवार निवृत्ती जाहीर करणार का? सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Supriya Sule On Sharad Pawar Retirement : ज्येष्ठ नेते शरद पवार एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यातील
Supriya Sule On Sharad Pawar Retirement : ज्येष्ठ नेते शरद पवार एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात जोराने सुरु आहे. यासाठी दोन्ही पक्ष चर्चा देखील करत असल्याची माहिती समोर आली आहे. पण आता शरद पवार राजकारणातून निवृत्ती घेणार असून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असल्याने पुढील काही दिवसात राज्यात राजकीय भूकंप येणार का? याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
केंद्र सरकार पुढील संसदीय अधिवेशनात डिलीमिटेशन बिल (Delimitation Bill) आणणार असून या बिलाला पाठिंबा देण्यासाठी शरद पवार एनडीएमध्ये जाणार मात्र यासाठी शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी केली असल्याचा दावा ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ ने केला आहे. ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ च्या दाव्यानुसार शरद पवार राजकारणातून निवृत्ती जाहीर करु शकतात. तर आता या दाव्यावर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शरद पवार निवृत्त होणार नाही. कोणी निवृत्त व्हायच हे जनता ठरवाणार अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. सुप्रिया सुळेंच्या प्रतिक्रियानंतर शरद पवारांच्या राजकीय निवृतीच्या (Sharad Pawar Retirement) चर्चेला पुर्णविराम लागला आहे.
शरद पवार (Sharad Pawar) निवृत्त होणार नाही. कोणी निवृत्त व्हायचं हे जनता ठरवणार आहे. शरद पवार यांच्या राज्यसभेची 5 वर्ष अजून बाकी आहेत. तेव्हाच शरद पवार निवृत्त कसे होतील? शरद पवार यांच्या सारख्या नेत्यांबद्दल अशा पद्धतीने निवृत्तीच्या बातम्या येत असतील तर हे संतापजनक आहे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्या निवृत्तीबाबत दिली आहे.
गोकुळ ‘अध्यादेशासाठी’ सरकारने मोजले तब्बल 80 लाख ; बंटी पाटील म्हणाले… –
शरद पवारांच्या निवृत्तीबाबत दावा काय?
शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर करावी आणि त्यांच्या पक्षाने एनडीएमध्ये प्रवेश करावे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली असल्याचा दावा ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ ने केला आहे. जर शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्या आतापर्यंतच्या भूमिकेला मोठा धक्का बसणार असल्याने त्यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि इतर नेत्यांनी एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घ्यावा याबाबत पक्षात चाचपणी केली जात असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. त्यामुळे आता शरद पवार काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.