Sushama Andhare : भाजपकडून जाणीवपूर्वक मविआमध्ये मिठाचा खडा टाकतयं

Sushama Andhare : भाजपकडून जाणीवपूर्वक मविआमध्ये मिठाचा खडा टाकतयं

Sushama Andhare On BJP : गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. त्यात आज सकाळपासून अजित पवार 40 आमदार घेऊन बाहेर पडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या सोशल मीडियाच्या कव्हरवरून कव्हर फोटो डिलीट केल्याची चर्चा आहे.

अजित पवार यांच्या फेसबुक आणि ट्विटरवरील कव्हर फोटो डिलीट केल्याचं दिसत आहे. त्यामुळे अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडियावरून राष्ट्रवादी हटवल्याची चर्चा रंगली आहे. पण असं असलं तरी त्याच्या ट्विटर बायोमध्ये मात्र अजूनही पक्षाच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे नक्की काय घडतं आहे, हे सांगणं अवघड झालं आहे.

स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का… अखेर अजित पवार यांनी मौन सोडलं

यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या ज्या पद्धतीने सध्या राजकारण सुरू आहे. ते जाणीवपूर्वक भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमध्ये मिठाचा खडा टाकण्याच काम सुरू आहे. वज्रमूठ सभा तसेच इतर सभा पाहता मुद्दामहून खोड करण्याची कार्यपद्धती भाजपची सुरू आहे.

मात्र आता सुरू असलेल्या राजकारणावरून शिंदे गटाच्या आमदारांची काळजी वाटत असल्याचं अंधारे यांनी म्हटले आहे. परंतु इतर काही असो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने ठामपणे ठरवले असून आम्हाला भाजपच्या मुजोरी विरोधात लढणे क्रमप्राप्त असल्याचं अंधारे म्हणाल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube