स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का… अखेर अजित पवार यांनी मौन सोडलं
गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. त्यात आज सकाळपासून अजित पवार ४० आमदार घेऊन बाहेर पडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर अखेर अजित पवार (Ajit Pawar) यांनी मौन सोडलं आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “माझ्याबद्दल ज्या बातम्या ज्या पसरवत आहेत. त्यात काही तथ्य नाही. आम्ही राष्ट्रवादीमध्ये आहोत आणि राष्ट्रवादी मध्येच राहणार आहे.” असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
याच मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, आज मला जे आमदार भेटायला आले होते. ते सर्वजण त्यांची काम घेऊन आले होते. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्वजण काम करत आलो आहोत, यात अनेक चढ उतार पाहिले आहेत.
सामजिक प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी
यावर पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्यात सध्या अनेक सामाजिक प्रश्न आहेत. सामजिक प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी या चर्चा सुरु केल्या जातात आणि अशा बातम्या दिल्या जात आहेत. अशी टीका देखील त्यांनी केली.
यावेळी त्यांनी माध्यमांवर देखील टीका केली. ते म्हणाले की कालपासून काही मीडियावाले माझ्या शासकीय घरासमोर कॅमेरा लावून बसले आहेत. तुम्ही तिथे का बसता? थोडी सभ्यता पाळा. मला जे काही बोलायचं आहे ते मी पक्ष कार्यालयात, विधानभवनात मांडेल. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या चालवू नका अशी विनंती अजित पवार यांनी केली आहे.
तो कार्यक्रम टाळता आला असता..
यावेळी अजित पवार यांनी महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात झालेल्या दुर्घटनेबद्दल देखील भाष्य केलं. ते म्हणाले की सरकारला या परिस्थितीची जाणीव होती, तर त्यांनी तो कार्यक्रम सकाळी ऐवजी संध्याकाळी घ्यायला पाहिजे होता. याशिवाय राज्य सरकारला देखील
Gulabrao Patil On Udhav Thackery : मला मंत्री करताना तीन-चारदा तपासलं, स्वतः थेट मुख्यमंत्री झाले
शरद पवार यांचं स्पष्टीकरण
या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवार म्हणाले की, “ही केवळ तुमच्या (माध्यमांच्या) मनातील चर्चा आहेत. या सर्व बातम्या खोट्या आहेत. अजित पवारही पक्षाचं काम करतायत. राष्ट्रवादीमध्ये सर्व काहीआलबेल आहे. सगळे सहकारी पक्षाला मजबूत करण्यासाठी कार्यरत आहेत.” असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी आज दिलं आहे.
काल अजित पवार यांचा पुरंदरमधील नियोजित दौरा त्यांनी अचानक रद्द केला. त्यामुळे त्यांच्या नियोजित दौरा शरद पवार यांनी पूर्ण केला. त्यामुळे अजित पवार पुन्हा नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर आता शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.