Sushama Andhare : नुसत्या शासन निर्णयाने सुधारणा होत नाही, अंधारेंचा शिंदे-फडणवीसांना टोला

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (54)

Sushama Andhare On Shinde-Fadanvis : आज छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची पुण्यतिथी आहे. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारने छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र अद्याप देखील या समाधीस्थळाच्या सुशोभिकरणाचे काम सुरू झालेले नव्हते. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘नुसतेच शासन निर्णय काढून सामाजिक सुधारणा होत नसते. शासन निर्णय काढल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होते की, नाही यावर काम करणे सुद्धा गरजेचे असते.

Sangali Accident : विजापूर-गुहागर राज्यमार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

पुढे त्या म्हणाल्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणाचे जेव्हा प्रयत्न सुरू केले. कोल्हापुरातील कांबळे नामक तरुणाला चहाचे दुकान टाकून दिले तेव्हा नुसतेच चहाच्या दुकानाचे बॅनरबाजी करत उद्घाटन करून सोस नाही केला तर त्याच्या दुकानावर ते स्वतः बसत. महाराजांकडे काही काम आहे अशी लोकं मग महाराजांना शोधत शोधत त्या चहाच्या दुकानावर येत.

महाराज कांबळेला चहा द्यायला सांगत. कप-बशीतून चहा आला की, कपातला अर्धा चहा बशीत ओतत महाराज बशी समोरच्या माणसाकडे करत. समोरच्या माणसाच्या मनात अर्थातच महाराजां इतका उदात्त दृष्टिकोन किंवा सामाजिक अभिसरण पोहोचलेलं नसायचं पण महाराजांकडे काम आहे आणि काय बिशात आहे की महाराजांनी ऑफर केलेला चहा त्याने नाकारावा..!!!

Tags

follow us