Raigad Boat : रायगड किनाऱ्यावरील बोटमध्ये पाकिस्तानी नागरिक असल्याची अफवा
रायगडच्या किनाऱ्यावर पाकिस्तानी नागरिक असलेली बोट आढळेल्याची माहिती काही वेळापूर्वी आली होती. त्यानंतर लगोलग मुंबई पोलिस या प्रकरणाच्या तपासाला लागले होते. नौदल आणि तटरक्षक दलाला ही बोट सापडली होती. या बोटीमध्ये दोन पाकिस्तानी तर 13 भारतीय नागरिक असल्याची माहिती होती. संशयित बोट दिसल्याचा कॉल आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलिस करत होते. त्यानंतर आता या बोटमध्ये पाकिस्तानी नागरिक नसल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार गैरसमजूतीमुळे झाला होता. या बोटील आर्थिक मदत करणाऱ्या उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने याची माहिती दिली आहे. याआधी बोटीमध्ये पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती होती.
मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर भाजप – महाआघाडीची शक्ती पणाला…
या बोटीचे नाव जलराणी असे आहे. ही बोट उत्तन मधील बेन्हार जॉनी बुटी यांच्या मालकीची आहे. आज सकाळी या बोटेला पकडण्यात आले होते. या बोटीमध्ये दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती होती. या बोटीमधील सर्व पंधरा खलाशांचे आधार कार्ड आमच्याकडे आहेत. त्यामध्ये कोणीही पाकिस्तानी नागरिक नाही, अशी माहिती लिओ कॉलासो यांनी दिली आहे.
राऊत धमकी प्रकरणातील आरोपीचा कुठल्याही गॅंगशी संबध नाही; पोलिसांची माहिती
दरम्यान, आज सकाळी ही संशयास्पद बोट आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. नौदल आणि तटरक्षक दलाला ही बोट रायगडजवळ सापडली होती. या बोटीमध्ये दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती होती. याआधी काही महिन्यांपूर्वी देखील अशीच एक संशयास्पद बोट रायगच्या किनाऱ्यावर आढळली होती.