मुलाला कॉपी पुरविणाऱ्या त्या तहसीलदारावर अखेर गुन्हा दाखल; प्रशासनाकडून मोठी कारवाई

Suspended Tehsildar Caught Giving Copies In Pathardi : बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवताना नायब तहसीलदाराला रंगेहाथ पकडण्यात आले असल्याची घटना नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात घडली. (Pathardi ) नायब तहसीलदाराचे नाव अनिल तोरडमल असून आता प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उघडण्यात आला आहे. त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते हरिहर गर्जे व किसन आव्हाड यांनी ही घटना प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या संदर्भात केंद्रसंचालक शिवाजी दळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अनिल तोरडमलच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.
मोठी बातमी! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील दत्तात्रय गाडेला बेड्या; मध्यरात्रीच्या थरारानंतर अटक
बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून तोरडमल आपल्या मुलासोबत परीक्षा केंद्रात येत होता. त्याच्याकडे असलेल्या शासकीय ओळखपत्रामुळे त्याला कोणी मज्जाव केला नाही; मात्र आज बारावीचा जीवशास्राचा पेपर चालू असताना केंद्रावर बंदोबस्तास असलेले पोलिस उपनिरीक्षक एम. व्ही. गुट्टे यांना तोरडमल यांच्यावर संशय आल्याने त्याची माहिती दळे यांना दिली.
त्यानंतर त्यांनी तोरडमल यांच्याकडे विचारपूस केली. त्याने चुकीची उत्तरे दिली, त्यानंतर आपण अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार असून, आपला मुलगा परीक्षा देत असल्याने आपण येथे आलो असल्याचे सांगितले. परीक्षा केंद्राबाहेर जाऊ द्या, अशी विनंती त्याने पोलिस व केंद्रसंचालकांना केली; मात्र त्याला पोलिसांनी बाहेर जाऊ दिले नाही.