नगरच्या नेत्यानं पाण्यावर तरंगत खोडून काढला ‘तो’ दावा

नगरच्या नेत्यानं पाण्यावर तरंगत खोडून काढला ‘तो’ दावा

Swabhimani Shetkari Sanghatana :  एखाद्या गोष्टीची आवड असेल तर ते सहज साध्य होते. याची प्रचिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे यांना आली. लहानपणापासून आवड असलेल्या मोरे यांनी दिवसभर तासंतास विहिरीच्या पाण्यावर तरंगून आराम करू शकतात. त्यांच्या या टेक्निकचे कौतुक सध्या सर्वत्र केले जात आहे.

रवींद्र मोरे हे राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील रहिवासी आहे. लहानपणी त्यांना विहिरीत पोहण्याची आवड निर्माण झाली. पाण्यात पोहल्यानंतर पाठीवर तरंगता आले तर आराम करता येईल असा विचार मनात आला. त्यानुसार पाठीवर झोपून पाय दुमडून स्थिर राहण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पोटामध्ये हवेचा समतोल राखून सुरुवातीला दोन-तीन मिनिटे सराव केला. त्यानंतर ते दिवसभर पाठीवर विहिरीमध्ये तरंगू लागले.

Letsupp Special : एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर असणार भाजपच्या विशेष टीमची नजर!

पोहणे हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. त्यामुळे रक्ताभिसरण, वजन नियंत्रणात राहते, आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे रवींद्र मोरे हे लहानपणापासून दररोज विहिरी पाण्यावर पोहण्याचा सराव करतात. त्यामुळे थकवा निर्माण होतो. पाण्यावर पाट ठेवून पाय दुमडून आराम करतात. त्यामुळे शरीरातील थकवा निघून जातो. याशिवाय मानसिक ताण ताण कमी होऊन मनाची एकाग्रता वाढण्यास मदत होते.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हिंगोली येथील ह.भ.प दुर्गसावंगीकर बाबाचे आव्हान स्वीकारले होते. बाबांनी चमत्कार असल्याचा दावा केला होता. या संदर्भात मोरे म्हणाले की यास शास्त्रीय कारण आहे. दररोजचा सराव,मनाची एकाग्रता, पोटामधील हवेचा समतोल राखलात तर पाण्यावर कोणीही तरंगू शकते. त्यासाठी सातत्य असणे गरजेचे आहे.

भाजप-एमआयएम नेत्यांचं गुलूगुलू! आरोप सत्रानंतर काय आहे मनात सांग माझ्या कानात…

रवींद्र मोरे यांच्या घरासमोर मोठी विहीर आहे. विहिरीमध्ये चार परस पाणी आहे. ते नियमितपणे थंड पाण्याने आंघोळ करतात. थंड पाणी हे आरोग्यदायी आहे. पूर्वी नद्या, विहिरी, बारव, पाट अशा ठिकाणी मुलांना पोहण्याचा छंद होता. मात्र अलीकडील काळात नद्या आटल्या. विहिरींनी तळ गाठले,मुलांमध्ये पोहण्याची आवड कमी झाली, पोहणाऱ्यांची संख्या घटली.

पाण्यावर तरंगण्यासाठी वर्षानुवर्षे सरावाची गरज आहे. पाण्याच्या मध्यभागी गेल्यानंतर पोटातील हवेचा बॅलन्स करणे व पाण्यातून श्वास घेणे हे जमल्यानंतरच पाण्यामध्ये तरंगणे सहज शक्य होते. त्याला कुठलेही शास्त्रीय कारण नसून हा एक कलेचा भाग आहे, असे मोरे म्हणाले आहेत.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube