शिक्षकांची मेगा भरती; ऑगस्टमध्ये 10,000 जागा भरणार, ‘झेडपी’सह खासगी शांळांचा समावेश

शिक्षकांची मेगा भरती; ऑगस्टमध्ये 10,000 जागा भरणार, ‘झेडपी’सह खासगी शांळांचा समावेश

Teacher Recruitment : जुलै अखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमधील रिक्त ३० टक्के पदांपैकी १० टक्के पदभरतीच्या जाहिराती शिक्षणाधिकाऱ्यांना पवित्र पोर्टलवर अपलोड करता येणार आहेत. पूर्वी जाहीर केलेली शिक्षक भरती सध्या सुरू आहे. दुसरीकडे खासगी (Teacher ) अनुदानित संस्थांना देखील या भरतीत सहभागी होता येणार आहे. (Recruitment) जिल्हा परिषदांमधील साडेतीन हजार तर खासगी संस्थांमधील सहा ते साडेसहा हजार पदे देखील त्यावेळी भरली जाणार आहेत.

१० टक्के पदे रिक्त  हिट अँड रन;मुळे पुणे पुन्हा हादरलं; अज्ञात वाहनाने दोन पोलिसांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू

राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मागील दहा वर्षांतील सर्वात मोठी शिक्षक भरती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमधील २२ हजार पदांचा समावेश आहे. दरम्यान, शासनाच्या निर्णयानुसार २० टक्के पदे रिक्तच राहतील, पण बिंदूनामावलीतील ‘एनटी-सी’ प्रवर्गाच्या आक्षेपामुळे १० टक्के पदे रिक्त ठेवण्यात आली होती.

 रिक्त पदांवर शिक्षक मिळणार VIDEO: नरेंद्र मोदी ते अजित पवार, लेट्सअपच्या Exclusive Interview मध्ये काय म्हणाले शरद पवार?

आता ती पदे ऑगस्टमध्ये भरली जाणार आहेत. यावेळी ज्या खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांना मागच्यावेळी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात अपलोड करता आली नाही. त्यांनाही संधी मिळणार आहे. याशिवाय बिंदूनामावली अपूर्ण असल्याने ज्या महापालिका, नगरपालिकांना त्यांच्या शाळांमधील शिक्षक भरण्याची जाहिरात अपलोड करता आली नाही, त्यांनाही त्यावेळी रिक्त पदांवर शिक्षक मिळणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube