सर्व राजकीय पक्षांना आमंत्रण, निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंचा मोर्चा कधी आणि कुठून निघणार ?
Raj Thackeray : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत धक्कादायक खुलासा झाल्यानंतर देशातील विरोधी पक्ष त्यांच्या राजीनाम्याची मागणी
Raj Thackeray : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत धक्कादायक खुलासा झाल्यानंतर देशातील विरोधी पक्ष त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे आता मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत मोठी घोषणा केली आहे. आज आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे बंधूंनी ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी विराट मोर्चा काढणार असल्याची माहिती दिली आहे. 4 ऑक्टोबर रोजी निघणाऱ्या या मोर्चाची जय्यत तयारी सुरु करण्यात आली असून आज झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी मोर्चाची दिशा सांगितली.
या पत्रकार परिषदेत राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, चार तारखेला हा संयुक्त मोर्चा निघेल. भायखळा वरुन हा मोर्चा निघेल आणि मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) समोर व्यासपीठ असेल आणि तिथे सभा होईल. सकाळी दहा वाजताची वेळ आहे. मोर्चात काय बोलायचे ते आम्ही बोलू. परतु, हा निवडणूक आयोगाच्या (Election Commission) विरोधातला मोर्चा आहे. गेली अनेक वर्ष या विषयांवर आम्ही बोलत आलोय. 2017-18 मध्ये मी अनेक नेत्यांना या संदर्भात भेटलो होतो. ईव्हीएम मशीनच्या संदर्भात मी भेटलो होतो, या विषयावर सविस्तर बोलणं चार तारखेला होईल असं या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, या मोर्चानंतर त्याची पुढील रुपरेषा आम्ही ठरवू. आम्ही सर्वच राजकीय पक्षांना आमंत्रण देणार आहे. सत्ताधारी पक्षातील लोकांना व्यासपीठावर यायचं असेल तर ते देखील येऊ शकतात. निवडणूक आयोगाचा गेल्या काही वर्षातला जो कारभार आहे त्या विरोधात हा मोर्चा आहे. प्रत्येकाल फोन करुन सांगितलं जाईल.या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसतील. यात सर्वांच्या हातात तिरंगाच असणार आहे. हा विषय या देशातील लोकशाही वाचवण्याचा आणि संविधान वाचवण्याचा आहे. त्यामुळे सर्वांच्या हातता तिरंगाच असेल.
डान्स फ्लोअरवर रंगणार हृता-सारंगची धमाल; ‘आली मोठी शहाणी’ मधील ‘बोनिता बोनिता’ गाणं प्रदर्शित
तर दुसरीकडे भाजप यांच्या टीकेवर देखील राज ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत उत्तर दिले आहे. विरोधी पक्षाला त्यांच्या पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडायचे आहे असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मराठीमध्ये एक म्हण आहे खाई त्याला खवखवे असं म्हणत त्यांनी भाजपला उत्तर दिले.