दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर राहिलेल्या 6 खासदारांना ठाकरे गटाचा दणका; पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस
बैठकीला पक्षाचे 9 पैकी तब्बल 6 लोकसभा खासदार अनुपस्थित राहिल्याने ठाकरे गटातील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे.
Thackeray group hits 6 MPs : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आणखी एका मोठ्या फुटीची शक्यता निर्माण झाली असून, पक्षाच्या संसदीय बैठकीत घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी राजकीय वर्तुळाचे चर्चांना उधाण आले आहे. दिल्लीत बोलावण्यात आलेल्या महत्वाच्या बैठकीला पक्षाचे 9 पैकी तब्बल 6 लोकसभा खासदार अनुपस्थित राहिल्याने ठाकरे गटातील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे.
दिल्लीतील संसद कार्यालयात पक्षाचे खासदार आणि मुख्य सॅचेट अनिल देसाई यांनी संसदीय पक्षाची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी सर्व ९ खासदारांना थ्री-लाईन व्हीप बजावण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष बैठकीला केवळ अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे तीनच खासदार उपस्थित राहिले. राज्यसभेचे संजय राऊत देखील या बैठकीला उपस्थित होते. उर्वरित सहा खासदारांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने पक्ष नेतृत्वाची चिंता वाढली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेल्या ऑपरेशन टायगरच्या चर्चा आता अधिकच रंगू लागल्या आहेत. ठाकरे गटातील 9 पैकी 7 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या घडामोडींमुळे 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाची आठवण पुन्हा ताजी झाली आहे. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी अनुपस्थित खासदारानावर जोरदार हल्लाबोल केला. ही केवळ अनुपस्थिती नसून गद्दारी, बेईमानी, कटकारस्थान आणि फसवणूक असल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील त्यांनी दिला.
TMC तील बंड अधिक तीव्र; ममता गटाची याचिका फेटाळली, ऋतब्रत बॅनर्जीच राहणार बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते
राऊत म्हणाले की, लोकसभा नेते अरविंद सावंत आणि मुख्य सचेतक अनिल देसाई यांनी अधिकृत बैठक बोलावली होती. पक्षाचा व्हीप असताना देखील जे खासदार उपस्थित राहिले नाहीत, त्यांनी पक्षशिस्त मोडली आहे. त्यामुळे ट्यान्कच्या विरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अनुपस्थित राहिलेल्या सर्व खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. अनिल देसाई यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, बैठकीनंतर तात्काळ नोटीस पाठवण्यात आली असून, तुम्हाला बैठक असल्याची माहिती देण्यात आली होती, संदेश आणि व्हाट्सअँपद्वारे कळवण्यात आले होते, तरी देखील तुम्ही अनुपस्थित का राहिलात याचे स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
संजय राऊत यांनी या प्रकरणासाठी थेट एकनाथ शिंदे आणि भाजपला जबाबदार धरत गंभीर आरोप केले. गद्दारीचे राजकार करणाऱ्यांना जनतेसमोर उत्तर द्यावे लागेल, असा इशारा देखील त्यांनी दिला. तसेच, पक्षाचे नाव आणि चिन्ह घेऊन निवडून आलेले खासदार पक्षाशी बेईमानी करू शकत नाहीत. व्हिपचे उल्लंघन केल्यास कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन स्वतंत्र गट किंवा विलीनीकरणाची मागणी केल्याची चर्चा सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, जर त्यांनी अध्यक्षांची भेट घेतली असेल तर त्यांनी खुलेपणाने समोर यावे. अभी देखील अध्यक्षांना भेटलो होतो आणि ते सर्वांसमोर आहे.
या संपूर्ण घडामोडींमुळे ठाकरे गटात मोठी फूट पडण्याची शक्यता अधिक बळावली आहे. पक्षाकडून आता अपात्रतेची कारवाई करण्याची तयारी सुरू झाली असून, अरविंद सावंत आवशयक कागदपत्रांची जुळवाजुळव करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. एकूणच, ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान ठाकरे गटातील सहा खासदारांची अनुपस्थिती हा केवळ योगायोग आहे की मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.