मोठी बातमी! अर्थ खात्यातील अधिकारी लाच घेताना ACB ने रंगेहात पकडला, काय आहे प्रकरण?

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील क्लर्कला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते.

News Photo   2026 04 05T165717.402

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचखोर (Mumbai) अधिकाऱ्यांविरुद्ध उघडलेल्या मोहिमेत आता अर्थ आणि नियोजन विभागाचा मासा गळाला लागला आहे. निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना कक्ष अधिकारी विलास लाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खारघर परिसरात रंगेहात अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्याच्या बदल्यात विलास लाड याने संबंधित व्यक्तीकडे मोठ्या रकमेची मागणी केली होती. शासकीय कामासाठी अडवणूक करून लाचेची मागणी होत असल्याची तक्रार एसीबीकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत एसीबीने सापळा रचला.

भोंदू अशोक खरातचा पाय खोलात; कोट्यावधींचे संशयास्पद व्यवहार, ईडी छापा टाकणार?

एसीबीच्या पथकाने नवी मुंबईतील खारघर परिसरात सापळा रचला होता. यावेळी लाचेची रक्कम ६ लाख ३७ हजार रुपये स्वीकारताना विलास लाड याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. मंत्रालयातील कामासाठी अशा प्रकारे उघडपणे लाच घेण्याचे हे दुसरे मोठे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. या कारवाईमुळे मंत्रालयातील इतर लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रशासनातील भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून पुन्हा एकदा देण्यात आला आहे.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील क्लर्कला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. एसीबीने त्याला मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन अटक केली होती. मंत्रालयात खुद्द मंत्र्याच्या केबिनमध्ये शिरून एसीबीने ही कारवाई केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. मंत्र्याच्या क्लर्कला अटक करण्यात आल्यामुळे महायुती सरकारवर मोठी नामुष्की ओढावली होती.

follow us