मुख्यमंत्री शब्दाला जागले! प्रजासत्ताक दिनी लोकशाहीवर बोलणाऱ्या ‘भुऱ्या’चे डोळे तपासले
मुंबई : जालन्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रजासत्ताकदिनी लोकशाहीवर भाषण करणारा भुऱ्या उर्फ कार्तिक वजीरच्या (Karthik Wazir) डोळ्याची तपासणी करण्यात आली आहे. भुऱ्याच्या अफलातून भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला होता. त्यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी त्याचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. जालना दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) देखील देखील भुऱ्याची भेट घेऊन त्याचं कौतुक केलं होतं. त्यावेळी भुऱ्याच्या दृष्टीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना समजले. त्यांनी तात्काळ दखल घेत भुऱ्याला वैद्यकीय मदत करण्याचं आश्वासन दिलं. अखेर मुख्यमंत्री शब्दांला जागले असून भुऱ्याच्या डोळ्याची तपासणी डॉक्टरांकडून करण्यात आलीय.
सोशल मीडियावर भुऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. मात्र, त्याला दृष्टीचा त्रास असल्याचं समजल्यानंतर अनेकजण हळवे झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हळवे झाल्यानंतर त्यांनी कार्तिकची दखल घेऊन त्याच्या उपचाराची जबाबदारी घेतली होती. दरम्यान, आता कार्तिकला वैद्यकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. राज्यातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.तात्याराव लहाने (Dr. Tatya Rao Lahane) यांनी आज कार्तिक वजीर उर्फ भूऱ्याच्या डोळ्यांची तपासणी केली.
https://www.youtube.com/watch?v=1ZTETdWcueg
कार्तिक जालिंदर वजीर हा मुळचा जालना जिल्ह्यातील असून तो रेवलगाव इथे पहिल्या इयत्तेत तो शिकतो. डोळ्यांमध्ये व्यंग असल्याने कार्तिकला लांबच्या अंतरावरच्या गोष्टी दिसत नाहीत. त्यामुळे वर्गातही कार्तिकला फळ्याजवळ पहिल्या बाकावर बसावे लागते. तो रंगाने गोरा असल्यामुळे सगळे त्याला भुऱ्या नावाने ओळखतात. कार्तिकचे वडील शेतकरी आहेत. घरची परिस्थितीही बिकट आहे. त्यामुळे कार्तिकची दृष्टी अधू असूनही पालकांनी त्याच्यावर अद्याप उपचार केले नव्हते. याची दखल दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतली होती.
मुख्यमंत्री शिंदे जालना दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी या भोऱ्या कार्तिकची भेट घेतली होती. त्या भेटीत मुख्यमंत्री शिंदे , त्यांचे OSD मंगेश चिवटे यांनी घेत या कार्तिकच्या वैद्यकीय उपचाराची जबाबदारी घेतली. दरम्यान, आता संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी कार्तिकला दिलेला आपला शब्द पूर्ण केला. आज जे. जे. इस्पितळात प्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी स्वत: चिमुकल्या कार्तिकच्या डोळ्यांची तपासणी केली.
Kasba By Election : नानांचं कुठं मनावर घेताय.., चित्रा वाघ यांनी काढला चिमटा
यावेळी डॉ. लहाने यांनी कार्तिकशी संवाद साधला. ते म्हणाले, कार्तिक, तुझ्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी मला फोन केला. आता तू वर्षातून मला तीन वेळा भेटायला ये. लवकरच तुझे डोळे बरे होतील, असं म्हणत भुऱ्या पूर्णपणे बरा होईल अशी ग्वाही डॉ लहाने यांनी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच भुऱ्याच्या डोळ्यांवर उपचार होणार असून त्याला निर्दोष दृष्टी होण्याचा प्राप्त मोकळा झाला आहे.