RTE Admission: ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ; अर्ज पडताळणी वेळखाऊ, पालकांना दिलासा
RTE Admission 2024 : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) अकोला जिल्ह्यातील निवड यादीत आलेल्या १९१८ विद्यार्थ्यांपैकी १३१२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर ६०६ जागा प्रवेशासाठी शिल्लक आहेत. (Admission) निवड यादीतून प्रवेशाची मुदत ५ ऑगस्ट पर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. येत्या ८ ऑगस्टपर्यंत पहिल्या यादीनुसार पालकांना आपल्या पाल्यांचा प्रवेश घेता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरटीईच्या पहिल्या निवड यादीनुसार एक हजार १३१२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
Avinash Sable: महाराष्ट्राच्या पठ्ठ्यानं करुन दाखवलं; अविनाश साबळेची स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत धडक
अंतरिम स्थगिती
अर्जाच्या पडताळणीची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने अर्ज करण्यात पालकांना अनेक अडचणी आल्या. तसंच, यंदा शालेय शिक्षण विभागाने पूर्वीच्या ‘आरटीई’च्या प्रवेश नियमांमध्ये बदल केले होते. पण, या बदलाला काहींनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि त्याठिकाणी अंतरिम स्थगिती मिळाल्यावर शालेय शिक्षण विभागाने तो बदल तात्पुरता थांबवून पालकांकडून दुसऱ्यांदा अर्ज भरून घेतले होते. दरम्यान, उच्च न्यायालयाने हा बदल रद्द ठरवल्याने विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच प्रवेश देण्यात येत आहेत.
सुरुवातीला ३१ जुलैपर्यंत निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदत देण्यात आली होती. परंतू, बहुतांश विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी असल्याने पुन्हा मुदत ५ ऑगस्टपर्यंत करण्यात आली. मात्र, पावसामुळे बऱ्याच भागांमध्ये पुरपरिस्थिती असल्याचं लक्षात घेऊन शिक्षण संचालयाने पुन्हा ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.मुदतवाढ मिळाल्यामुळे पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आणखी प्रवेशासाठी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे पालकांनी तालुका स्तरावर अर्जांची पडताळणी करुन घ्यावी, असं आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आलं आहे.
Video: बांगलादेशमध्ये हिसांचाराचं रौद्र रूप; आंदोलकांनी माजी कर्णधाराचं घर पेटवलं; व्हिडिओ व्हायरलं
प्रतीक्षा यादीचे मेसेज जाणार
निवड यादीनुसार प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना अर्ज पडताडी करण्यासाठी मेसेज पाठवण्यात आले होते. आता पहिल्या फेरीची मुदत ८ ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यामुळे प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना मेसेज पाठवण्यात येतील. प्रतीक्षा यादीत आपलं नाव आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर जाऊन प्रतीक्षा यादी पाहावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
प्रवेश प्रक्रिया
- आरटीईच्या शाळा – १९७
- एकूण जागा – २०१४
- प्रवेश पात्र विद्यार्थी – १९१८
- प्रवेश निश्चित झालेले विद्यार्थी – १३१२