Devendra Fadanvis : ‘त्या’ सात जणांच्या हत्याकांडाबाबत गृहमंत्री म्हणाले…
अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्या पारनेरमधील सात जणांच्या हत्याकांडाबाबत विचारले असता ते म्हणाले की, यासंदर्भात तपास सुरू आहे. तपास एका योग्य टप्प्यावर आल्या शिवाय काणताही निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर तपास एका योग्य टप्प्यावर पोहचला की, त्यावर बोलणे योग्य असेल. असंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिल्लीला जात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यावर प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले की, ‘अमित शाह यांच्याशी राज्यातील मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा झालेली नाही. मात्र आम्ही मंत्रीमंडळ विस्तार लवकरच करणार आहोत.’ असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.
‘ही बैठक प्रत्येक जिल्हानियोजनाचा जो काही प्लान तयार केलेला असतो तो प्लान या बैठकीमध्ये आमच्यासमोर सादर केला जातो. त्यानंतर आम्ही सगळ्यांचे प्लान एकत्र करून त्यावर बजेटमध्ये निर्णय घेतला जातो. मात्र यावेळी आचारसंहिता सुरू असल्याने आम्हाला निवडणूक आयोगाने मर्यादित परवानगी दिली आहे. त्यामुळे आम्हाला मोठे निर्णय घेता येणार नाही. पण प्लान सादर करता येईल. ती प्रक्रिया आम्ही पुर्ण करू. तर आचारसंहिता संपल्यावर आम्ही मराठवाड्याला काय द्यायचं ? ते ठरवू. अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली आहे.’