हद्दच झाली राव! सोलापुरात ‘गौतमी पाटील थाळी’ सुरू

हद्दच झाली राव! सोलापुरात ‘गौतमी पाटील थाळी’ सुरू

सोलापूर : काही दिवसांपासून चर्चेत असलेली नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नावानं आता थाळी सुरु करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. होय खरंय, सोलापुरातील नृत्यांगना गौतमी पाटीलच्या एका चाहत्याने आपल्या हॉटेलमध्ये गौतमी पाटील थाळी सुरु केलीय.

टेंभुर्णीमध्ये हॉटेल सुमनमध्ये नृत्यांगना गौतमी पाटील थाळीचा आस्वाद ग्राहकांना घेता येणार आहे. या थाळीची विशेषत: म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या हस्तेच हॉटेल सुमनाचे उद्घाटन करत गौतमीच्या नावाने थाळी सुरु केली आहे. नुकतेच हॉटेल सुमन या शुद्ध शाकाहारी हॉटेलचे उद्घाटन झाले.

सध्या सोशल मिडियावर नृत्यांगना गौतमी पाटीलची प्रसिध्दी मोठ्या प्रमाणात झाली असून प्रसिद्धीचा फायदा घेत हॉटेल मालक महेश गोरे यांनी ही थाळी सुरु केलीय. गौतमी पाटील यांच्या नावाने शुद्ध शाकाहारी थाळी सुरु करत मार्केटिंगचा नवीन फंडा शोधून काढलाय.

या स्पेशल थाळीमध्ये भेंडी फ्राय, मिक्स व्हेज, सलाड, स्पेशल डाळ फ्राय, चार बटर रोटी, गुलाबजाम असे पदार्थ देऊन ही थाळी सजविण्यात आली आहे. नृत्यांगना गौतमी पाटील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक गावांमधील यात्रांमध्ये ऑर्केष्ट्राचे कार्यक्रम करत आहेत. त्यांनी या कार्यक्रमात केलेल्या नृत्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायलर झाल्यानंतर त्यांना मोठी प्रसिध्दी मिळालीय.

कित्येकदा गौतमी पाटील वादाच्या भोवऱ्यात देखील सापडल्या असून वादातून सापडल्या असतानाही त्यांच्या चाहत्यांची कमी होताना दिसून येत नाही. अशातच महेश गोरेंनी सुरु केलेल्या गौतमी पाटील थाळीची सर्वत्र चर्चा होत आहे. अश्लील नृत्याप्रकरणी गौतमी पाटीलवर लावणी कलावंतांकडून टीका-टीपण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर गौतमी पाटील यांनी माफी मागत असं नृत्य करणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.

तेव्हापासून गौतमीला प्रसिध्दी मिळण्यास सुरुवात झाली. आता ही प्रसिध्दी थेट हॉटेलमधील जेवणाची थाळी बनवण्यापर्यंत पोहोचलीय. त्यासोबतच गौतमीचं एक गाणं देखील चांगलच चर्चेत आलं आहे. सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम या गाण्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं दिसून येत आहे.

ऑर्केष्ट्रा कार्यक्रमानंतर गौतमी पाटील आता लवकरच चित्रपटाच्या पडद्यावर झळकणार असल्याची माहिती समोर आलीय. घुंगरु या चित्रपटातून गौतमी पाटील प्रेक्षकांच्या भेटील येत आहे. दरम्यान, सोलापुरच्या एका चाहत्याने गौतमी पाटील थाळी सुरु केल्याने सोलापुर जिल्ह्यासह महाराष्ट्रात ही थाळी सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube