‘प्रति सभागृह’ उभं करत महाविकास आघाडीचा सरकारवर हल्लाबोल

‘प्रति सभागृह’ उभं करत महाविकास आघाडीचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर : हिवाळ अधिवेशानाच्या चौथ्या दिवशी झालेल्या गदारोळाचे पडसाद उमटत असताना आज पाचव्या दिवशीही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रती सभागृह उभे करुन आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सत्ताधारी सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आले आहे.

यावेळी विधान भवनाच्या पायर्‍यांवर प्रती सभागृह भरवून महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपले विचार मांडले व महापुरुषांचा अपमान करणार्‍या सरकारचा निषेध केला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना मराठी भाषिक लोकांना आधार देण्यासाठी, मराठी भाषिकांना महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. सर्वजण तुमच्यासोबत उभे आहोत असे चित्र निर्माण करण्यासाठी दोन्ही सभागृहात ठराव एकमताने मंजूर करायला तयार आहोत.

त्यामुळे तो ठराव घ्या, अशी विनंती करण्यात आली होती. परंतु आज आठवडा संपतोय तरीही त्यांनी तो ठराव घेतला नाही. मात्र, सोमवारी तो ठराव कोणत्याही परिस्थितीत घेण्यास भाग पाडू, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला ठणकावून सांगितले.

भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना महाविकास आघाडीचे आमदार श्रद्धांजली वाहत आहे आणि दुसरीकडे शिंदे सरकार कामकाज करत आहेत. मुळात सरकारने विधानसभा सदस्य म्हणून आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहून कामकाज थांबवायला हवे होते, असे मत व्यक्त करत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube