Mahrashtra Rain : निम्मा जून महिना उलटून गेला तरी मृगाच्या पावसाचा अद्यापही थांगपत्ता नाही. मान्सूनचे (Monsoon) यंदा 11 जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले. मात्र, अद्यापही अद्याप पाऊस झालेला नाही. त्यामुळे येऊ घातलेल्या खरीप हंगामाची (Rainy season) अद्याप सुरुवात झाली नाही. कोरडवाहू क्षेत्रात कपाशीच नव्हे तर अन्य वाणांचा दाणाही पडला नाही. त्यामध्ये हवामान अभ्यासक आणि शेतकऱ्यांना ज्यांच्या हवामानविषयक अंदाजावर अत्यंत विश्वास आहे. त्या पंजाबराव डख यांचे हवामान अंदाजही चूकत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. (The rain forecast was wrong explained Punjabrao Dukh)
रामलल्लाचे दर्शन कधी होणार?; प्राणप्रतिष्ठा ते दर्शनापर्यंतची संपूर्ण टाइमलाईन जाहीर
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील पंजाबराव डख यांनी अनेकदा पावसाविषयी अंदाज मांडले आहेत. मात्र त्यांचे हे अंदाज चूकीचे ठरल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी दिसून येत आहे. कारण पंजाबराव डख यांचे हवामान अंदाज खरे ठरल्याचे अनेकदा शेतकरी सांगतात. त्यांचे अंदाज म्हणजे तंतोतंत खरे ठरत असल्याचे अनेकदा प्रत्यय येतो. मात्र यावेळी त्यांचे अंदाज चूरकीचे ठरत आहेत. पाहूयात डख यांनी कोणकोणते अंदाज मांडले आणि ते कसे चूकीचे ठरले आहेत.
आता निवडणुका झाल्यास कोण जिंकणार? राष्ट्रवादीने थेट आकडाच सांगितला
का चुकले अंदाज ? डख यांचं स्पष्टीकरण…
सोशल मीडिया आणि शेतकरी वर्गामध्ये पंजाबराव डख यांनी मांडलेले पावसाविषयीचे अंदाज चूकीचे ठरल्याने चर्चा सुरू झाली. त्यामुळे डख यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ऐन मान्सून येण्याच्या तोंडावर अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले. त्यामुळे मान्सून कमकुवकत झाला. त्यामुळे देशावरूल सर्व बाष्प या वादळाकडे गेले. अशीच परिस्थिती 2015 साली झाली होती.
पुढे ते असं देखील म्हणाले की, दरवर्षी अशी चक्रीवादळे जरी तयार झाली तरी ती ओमानकडे सरकतात. मात्र यावेळी असे झाले नाही. ऐन मान्सून येण्याच्या तोंडावर अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले. ते थेट गुजरातच्या दिशेने सरकले आणि राज्यातील मान्सूनवर त्याचा विपरित परिणाम झाला. असं स्पष्टीकरण डख यांनी आपल्या चकलेल्या अंदाजावर दिले आहे.
काय होता पंजाबराव डख यांचा अंदाज?
मे महिन्यामध्ये 22, 23 आणि 24 मे रोजी मराठवाडा आणि तसेच राज्यातील बहुतांश भागात पाऊस होणार असा अंदाज डख यांनी व्यक्त केला होता.त्यानंतर डख यांनी 26 आणि 27 मे ला मान्सून सक्रिय होऊन राज्यात मान्सून 1 ते 3 जूनदरम्यान दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, शक्यतेनूसार मान्सून बरसला नसल्याचं दिसून आलं.
त्यानंतर 8 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर डख म्हणाले होते की, 8, 9 आणि 10 जूनला राज्यात मान्सूनचा पाऊस होणार आहे. पेरणीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी ठेवावी. असं देखील ते म्हणाले होते. मात्र त्यांच्या अंदाजाप्रमाणए पाऊस आलेला नाही.
मान्सूनविषयीचा अंदाजही चुकला…
यावेळी पंजाबराव डख यांनी सांगितलेला मान्सूनविषयीचा अंदाजही चूकला आहे. त्यांनी सांगितले होते की, 1, 2 आणि 3 जूनला केरळमध्ये मान्सून दाखल होईल पण त्यांचा अंदाज चुकला आणि केरळमध्ये मान्सून 8 जूनला आला. तर राज्यातील मान्सूनविषयी ते म्हणाले होते की, 8 जूनला राज्यात दाखल होईल पण तेव्हाही त्यांचा अंदाज चुकला आणि 11 जूनला राज्यात मान्सून दाखल झाला खरा पण अद्यापही राज्यात पाऊसच आलेला नाही. त्यानंतर त्यांनी 20 जूनपर्यंत राज्यात पाऊस पडेल असे सांगितले मात्र 20 जून उजाडला तरी देखील शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.