बावधन-कोथरूड क्रीडा महोत्सवाच्या ट्रॉफी अनावरण सोहळ्याचा कार्यक्रम महसूलमंत्र्यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न
बावधन–कोथरूड परिसरात आयोजित क्रीडा महोत्सवाच्या ट्रॉफी अनावरण सोहळ्याचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे संपन्न.
The trophy unveiling ceremony of the sports festival concluded with enthusiasm : बावधन–कोथरूड परिसरात आयोजित क्रीडा महोत्सवाच्या ट्रॉफी अनावरण सोहळ्याचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे संपन्न झाला. या कार्यक्रमाला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे(Chandrshekhar Bavankule) यांची प्रमुख उपस्थिती लाभली, ही आमच्यासाठी विशेष सन्मानाची बाब ठरली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून खेळाचे महत्त्व, युवकांमध्ये शिस्त, संघभावना आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यातील क्रीडासंस्कृतीची भूमिका प्रभावीपणे मांडली.
भर कार्यक्रमात बड्या उद्योगपतीकडून CM फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख अन्…
मोठ्या संख्येने उपस्थित असलेले क्रीडाप्रेमी नागरिक, संघांचे प्रतिनिधी आणि युवा खेळाडू यांच्यामुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि आनंददायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणाऱ्या महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे, तसेच सर्व मान्यवर, खेळाडू आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार. खेळ, समाज आणि युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील. असं प्रतिपादन यावेळी आयोजकांकडून करण्यात आलं.
