Ajit Pawar : लाथ मारुन पाणी काढण्याची धमक नाही.., अजित पवारांकडून विरोधकांचा समाचार

Ajit Pawar : लाथ मारुन पाणी काढण्याची धमक नाही.., अजित पवारांकडून विरोधकांचा समाचार

अहमदनगर : राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीवारी करीत आहेत, अद्याप त्यांच्याकडून काही होत नाहीये, आता आम्ही प्रकल्प दिल्लीवरुन घेऊन असं ते म्हणताहेत, यांच्यात लाथ मारुन पाणी काढण्याची धमक नसल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. अहमदनगरमध्ये पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

पवार म्हणाले, आत्तापर्यंत मोठ-मोठ्या नेत्यांचा काळ तुम्ही आम्ही पाहिलेला आहे, कोणाच्याच काळात असं फोडाफोडीचं राजकारण झालेलं नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात असं राजकारण पाहायला मिळालयं. विरोधकांनी मध्यप्रदेशातही कमलनाथांचे आमदार फोडून तिथं सरकार आणल्याचं त्यांनी म्हटलंय.

विरोधी पक्ष म्हणून आम्हांला जनतेनं कौल दिला, आम्हीही स्वीकारला आहे. तुम्ही जनतेची कामे करा. लोकांची कामे करणे, अपेक्षित असं राज्य चालवणे, असं हे लोकं करीत नसल्याचं दिसत आहे. राज्यात फक्त दोघांचच सरकार आहे. आम्ही अनेक टीका केल्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळात 18 लोकं घेतली, असल्याचंही ते म्हणालेत.

विरोधकांना अद्याप एकही महिला सापडतं नाहीये. महिलांनी पदावर बसविण्यासाठी शरद पवारांनी महिलांना 33 टक्के आरक्षण आणलं नाहीतर आणि यांना एकही महिला सापडतं नसल्याचाही टोला अजित पवारांनी लगावलाय. उरलेले 40 आमदार मंत्रिपदासाठी नवस करीत आहेत. अभिषेक करीत आहेत. अद्याप यांना कोणताही देव पावत नाहीये, तर दुसरीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीवारी करीत आहेत. यांच्या अशा कारभारामुळे राज्याचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीवारी करीत आहेत, अद्याप त्यांच्याकडून काही होत नाहीये, आता आम्ही प्रकल्प दिल्लीवरुन घेऊन असं ते म्हणताहेत, यांच्यात लाथ मारुन पाणी काढण्याची धमक नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. दरम्यान, चंद्रावर जाऊन वाटोळ करण्यापेक्षा लोकांची कामे करणं महत्वाचं नाही का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube