हे योग्य नाही…भुजबळांच्या ‘त्या’ फोटोवर जयंत पाटलांचा सभागृहात आक्रमक पवित्रा

हे योग्य नाही…भुजबळांच्या ‘त्या’ फोटोवर जयंत पाटलांचा सभागृहात आक्रमक पवित्रा

नागपूर : भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मॉर्फ केलेला फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रसारित करून त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

अतुल भातकळकरांच्या या प्रकाराकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले आहे. सभागृहातला सदस्यचं जर दुसऱ्या सन्माननीय सदस्याचा फोटो मॉर्फ करून सोशल मिडियावर प्रसारित करुन ट्रोल करत असेल तर योग्य नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हंटलंय.

आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर काय कारवाई करणार आहेत? असाही सवाल यावेळी सभागृहात पाटील यांनी विचारला आहे. जयंत पाटील यांनी छगन भुजबळांचे सोशल मिडियावर प्रसारित केलेलं ते छायाचित्र दाखवत, हा प्रकार गंभीर असल्याचं त्यांनी म्हंटलयं.

या सर्व प्रकारावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून ते म्हणालेत की, राजकारणातील नेत्यांनी अशा गोष्टी करु नये, त्यांनी सोशल मिडियावर संहिता पाळाव्यात, असं आवाहन त्यांनी सर्वच नेत्यांना सभागृहात केलं आहे.

दरम्यान, 20 डिसेंबर रोजी छगन भुजबळ विधिमंडळ परिसरात दाखल झाले. त्यावेळी ते काँग्रेसचे नेते भाई जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि शशिकांत शिंदे यांच्यासोबत बोलत उभे होते. त्यावेळी हे फोटो काढण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या डोक्यावर सांताक्लॉजची टोपी नसल्याचं स्पष्ट दिसत आहे.

त्यांच्या डोक्यावर त्यावेळी सांताक्लॉजची टोपी नव्हती मात्र प्रसारित करण्यात आलेल्या फोटोमध्ये सांताक्लॉजची टोपी दाखवण्यात आलीय. अतुल भातखळकर यांच्या ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या छगन भुजबळ यांच्या फोटोत फक्त भाई जगताप दिसत आहे. तर त्यांच्या डोक्यावर सांताक्लॉजची टोपीही दाखवण्यात आलीये. मूळ फोटोशी छेडछाड करून हा फोटो तयार केलेला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube