Milind Narvekar : ‘बॉस’ राईट, पण नार्वेकरांचा अंदाज फ्लॉप; ‘त्या’ 1 टक्क्याने नार्वेकरांना धक्का…

MLA Election नार्वेकर हे केवळ उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक नाहीत, तर ते मविआतील एक महत्त्वाचे रणनीतिकार मानले जातात

  • Written By: Published:
Milind Narvekar : 'बॉस' राईट, पण नार्वेकरांचा अंदाज फ्लॉप; 'त्या' 1 टक्क्याने नार्वेकरांना धक्का!

Milid Narvekar Prediction Failed On MLC : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अखेर अंबादास दानवे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. मात्र, या सर्व घडामोडींत सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि सावलीसारखे सोबती मानले जाणाऱ्या मिलिंद नार्वेकर यांच्या एका विधानाची. “बॉस इज ऑलवेज राईट” म्हणणाऱ्या आणि ठाकरेंचे अत्यंत विश्वासू असणाऱ्या नार्वेकरांना आपल्याच ‘बॉस’च्या मनातलं ओळखता आलं नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नेमकं काय म्हणाले होते नार्वेकर आणि त्या एका टक्क्याने नार्वेकरांचा अंदाज कसा चुकला ते जाणून घेऊया…

Ambadas Danve : ‘गद्दारांना’ गाडण्यासाठी ठाकरेंचा ‘मराठवाडा प्लॅन’; दानवेंच्या उमेदवारीची 5 मोठी कारणं!

काय म्हणाले होते नार्वेकर?

विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर होण्याच्या अवघ्या काही तास आधी मिलिंद नार्वेकर यांनी एक अत्यंत सूचक आणि आत्मविश्वासाने भरलेले विधान केले होते. ते म्हणाले होते की, “विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हेच 99 टक्के उमेदवार असतील. पण ठाकरे असल्याने उरलेल्या एक टक्क्याचे सांगता येत नाही. पण ‘बॉस इज ऑलवेज राईट'”, असे नार्वेकर म्हणाले होते. त्यांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात अशी समजूत झाली होती की, उद्धव ठाकरे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत. Milid Narvekar Prediction Failed

चाकणकरांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! सरपंचपदाच्या निवडणुकीत भाऊ बोराटेंचा पराभव

99 टक्के खोटे ठरले, 1 टक्का खरा ठरला!

उद्धव ठाकरे हे केवळ पक्षाचे प्रमुखच नाहीत, तर नार्वेकरांचे ‘बॉस’ आहेत. पक्ष संघटनेत नार्वेकरांना असलेले महत्त्व आणि त्यांची ठाकरेंशी असलेली जवळीक पाहता, त्यांचे विधान म्हणजे अंतिम निर्णय मानला जात होता. मात्र, ठाकरेंनी दानवेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करून नार्वेकरांचा ’99 टक्के’ अंदाज खोटा ठरवला. नार्वेकर ज्या एक टक्क्याबद्दल साशंक होते, त्याच एक टक्क्यामध्ये ठाकरेंनी आपली रणनीती बदलली आणि नार्वेकरांचे ‘मन वाचण्याचे’ कौशल्य फिके पडले.

May be an image of text that says '" letsupp 28एप्रिल2026 28 एप्रिल 2026 विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हेच 99 टक्के उमेदवार असतील. पण ठाकरे असल्याने उरलेल्या एक टक्क्याचे सांगता येत नाही. पण Boss is always right मिलिंद नार्वेकर आमदार'

विश्वसनीयता आणि राजकीय समीकरण

मिलिंद नार्वेकर हे केवळ उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक नाहीत, तर ते महाविकास आघाडीतील एक महत्त्वाचे रणनीतिकार मानले जातात. त्यामुळे नार्वेकरांसारख्या व्यक्तीने केलेले विधान चुकीचे ठरणे, हे आश्चर्यकारक असून, ठाकरेंनी दानवेंना उमेदवारी देऊन आपल्या ‘विश्वासू’ सहकाऱ्यालाही अनपेक्षित धक्का दिला आहे. यावरून उद्धव ठाकरे हे ऐनवेळी असे निर्णय घेऊ शकतात, ज्याचा अंदाज त्यांच्या निकटवर्तीयांनाही येत नाही, हे सिद्ध झाले आहे.

महाविकास आघाडीत फूट ? विधान परिषदेसाठी काँग्रेसही देणार उमेदवार

पुढील रणनीती काय?

अंबादास दानवे यांच्या उमेदवारीमुळे ठाकरे गटाने संघटनात्मक बळकटीकरणाला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे, ‘बॉस नेहमीच राईट असतात’ हे विधान नार्वेकरांनी जरी केले असले, तरी यावेळी त्यांच्या ‘बॉस’ने त्यांना ‘लाईट’ मध्ये घेऊन आपली ‘टाईट’ रणनीती राबवली आहे, हे नाकारता येणार नाही. आगामी निवडणुकीत नार्वेकर या धक्क्यातून कसे सावरतात आणि ठाकरेंच्या रणनीतीत त्यांची भूमिका काय असते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

follow us