अनेकांना ठाकरे नाव पुसायचंय पण आम्ही वादळासोबत खेळून मोठे झालोत; उद्धव ठाकरे गरजले

बाळासाहेबां ठाकरेंच्या जयंतीनिमीत्त उद्धव ठाकरे बोलत होते. मंचावर राज ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, मनसे युवा नेते अमित ठाकरे उपस्थित होते.

  • Written By: Published:
News Photo   2026 01 23T214220.030

आपल्याला गद्दारीचा शाप लागलेला आहे. गद्दारी आपल्याला नवी नाही. (Mumbai) मेलो तरी बेहत्तर पण, गुलामीत जाणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि झालेल्या पक्षाच्या फुटीवर भाष्य केलं. ते आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 100 वी जयंतीनिमीत्त आयोजीक कार्यक्रमात बोलत होते. मंचावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, मनसे युवा नेते अमित ठाकरे उपस्थित होते.

पुढे बोलताना उद्ध ठाकरे म्हणाले, मत विकत घ्याला पण, मन कसं विकत घ्याल? मला घराणेशाहीचा अभिमान आहे. ठाकरे नाव पुसायला अनेक जण येत आहेत, परंतु, आम्ही वादळासोबत खेळून मोठे झालो आहोत. अनेक चढउतार पाहून मोठे झालो अशी गर्जनाही त्यांनी यावेळी केली.

आजच्या राजकारणात ‘गुलामांचा बाजार’, सध्याच्या राजकारणावर राज ठाकरे यांचं भाष्य

विरोधकांना त्यांच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते त्याला मी काही करु शकत नाही. जेव्हा आपण महाराष्ट्राचा, महाराष्ट्र धर्माचा विचार करतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापूर्वीचा विचार केला तरी गद्दारी हा विषय आजचा नाही. हा आपल्याला शाप लागलेला आहे. जेव्हा विजय अशक्य असतो तेव्हा आपला शत्रू गद्दारांची मदत घेत असतो. गद्दारी आजपर्यंत भगव्याशी झाली नसती तर महाराष्ट्रानं जगाचा इतिहास बदलून दाखवला असता, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आपलेच दांडे आपल्यावर घाव घालण्यासाठी हे दोन व्यापारी वापरत आहेत. आपल्याला राग येतोय नाय येत आहे. मुंबईची लढाई तुम्ही चांगली लढलात, आज सगळे हळहळत आहेत. ही लढाई तुम्ही उत्तम पद्धतीनं लढलात,अशा प्रतिक्रिया देशभरातून येत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना संपली, ठाकरे नाव पुसून टाकणार हे चित्र केलं जात होतं, त्यांना तुम्ही रोखलंत, हे फक्त महाराष्ट्र करु शकतो, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. संपूर्ण महाराष्ट्र यांना वेगळ्या पद्धतीनं पादाक्रांत करायचाय, महाराष्ट्र गिळायचा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईत पहिल्यांदा पैशांचा वापर केला गेला. दार बंद असलं तर दाराच्या खालून लिफाफे फेकण्यात आले.महाराष्ट्रात विकत घेताय का? मत विकत घ्याल पण मन कसं विकत घ्याल, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. ठाकरे नाव पुसून टाका, शिवसेना नाव पुसून टाका मग मुंबई आणि महाराष्ट्राचा विचार करा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Tags

follow us