Uddhav Thackeray : गद्दारांचा दावा खोटा… पक्षप्रमुख पदासाठीची निवडणूक घेऊ द्या!

Uddhav Thackeray : गद्दारांचा दावा खोटा… पक्षप्रमुख पदासाठीची निवडणूक घेऊ द्या!

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णय लागेपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये, असे आमच्यासह घटनातज्ञ यांचेही मत आहे. गद्दारांनी शिवसेनेवर केलेला दावा अत्यंत हास्यास्पद असून गद्दारांचा दावा हा खोटा आहे. तसेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे मुख्यनेता पद घटनाबाह्य आहे. कारण शिवसेनेत मुख्यनेता पदच नाही. ते राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावू शकत नाही. त्यामुळे शिवेसेनेच्या (Shivsena) घटनेत प्रमुख म्हणून माझी निवड झाली आहे. त्यामुळे गद्दारी केलेले १६ आमदार हे सर्वोच्च न्यायालयच्या निर्णयात अपात्र होणार आहेत. त्यामुळे त्यांचे धनुष्यबाण चिन्ह मागण्याला काहीही अर्थ नाही. तोपर्यंत आम्हाला पक्षनेता पदाची निवडणूक घेऊ द्या, अशी आमची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी आहे, असे शिवसेनेचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगात सुरु असलेल्या सुनावणीबाबत पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. उद्धव ठाकरे म्हणाले की, केवळ आमदार आणि खासदार म्हणजे पक्ष नाही. शिवसेनेत वॉर्ड स्थरापासून रचना आहे. वॉर्ड अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख अशी रचना आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागेपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये, हे आमच्यासह घटनातज्ञ यांचे देखील मत आहेत.

शिवसेना प्रमुख हा शब्द फक्त बाळासाहेब ठाकरे यांनाच शोभून दिसत. म्हणून ते अबाधित ठेवलं आहे. पक्ष हा तळागळातील कार्यकर्त्यांवर अवलंबून असतो. आमच्याबरोबर असे कार्यकर्ते सोबत आहेत. त्याचे पुरावे आम्ही निवडणूक आयोगाला सादर केले आहेत. त्यामुळे आम्हाला निवडणूक घ्यायला परवानगी द्यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाला केली आहे. त्यांनी अद्याप मंजुरी दिली नाही, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube