Weather Update : राज्यात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Unseasonal Rain Orenge Alert to districts : महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) आणि गारपिटीने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळं शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. अजूनही अनेक भागात अवकाळी पाऊस सुरूच आहे. अशातच आता प्रादेशिक हवामान विभागाकडून (Meteorological Department) पुढील 2 दिवसांसाठी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे.
त्यामुळे हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये परभणी,लातूर हिंगोलीला ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात सध्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गुरूवारी पुण्यात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी गुढघ्यापर्यंत पाणी साचलं होतं. त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्याने आयटीयन्ससह स्थानिक रहिवाशांना मोठ्या मनःस्थापाला सामोरे जावे लागले. अनेक वाहने या पाण्यात बंद पडली होती.
Maharashtra Politics : सत्तासंघर्षाचा निकाल लागणार? 8 ते 12 मे शिंदे-फडणवीसांसाठी महत्त्वाचे
मार्च आणि एप्रिल महिन्यात महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यानंतर आता एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही आणि आता पुन्हा अवकाळी पावसानं (Unseasonal rain) झोपडपून काढलं. राज्यात मागील गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं कहर केल्यानं अनेक भागातील शेती पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. अजूनही अनेक भागात अवकाळी पाऊस सुरूच आहे.