ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात महाराष्ट्र दिनी वज्रमूठ सभा, गर्दीच रेकॉर्ड मोडणार?

  • Written By: Published:
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात महाराष्ट्र दिनी वज्रमूठ सभा, गर्दीच रेकॉर्ड मोडणार?

Vajramuth Sabha Maharashtra Day In Mumbai : संविधानाच्या रक्षणासाठी आणि राज्यातल्या घटनाबाह्य सरकारविरोधात महाविकास आघाडी गेले अनेक महिने राज्यभर आवाज उठवत आहे. महाराष्ट्रात ह्याआधी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे संविधान रक्षणासाठी ‘वज्रमूठ’ सभा झाल्या. त्यानंतर आता महाविकास आघाडीची पुढची ‘वज्रमूठ’ सभा महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून, 1 मे 2023 रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथे संपन्न होणार आहे.

मुंबईत होणा-या ह्या सभेच्या नियोजनासाठी महाविकास आघाडीच्या पुढाकाराने महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवासैनिक ह्या नियोजनात सहभागी झाले आहेत.

1 मे 2023 रोजी, वांद्रे येथील वांद्रे कुर्ला संकुल म्हणजेच बि के सी येथे सायंकाळी 5.30 वाजता महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ सभेला सुरुवात होईल. राज्यभरात महाविकास आघाडीला मिळत असलेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मुंबईत कळस गाठेल आणि अतिभव्य अशी सभा होईल अशी आयोजकांना खात्री आहे.

‘मन की बात’ सुरु अन् नारायण राणेंना लागली ‘डुलकी’

उद्धव ठाकरेंच्या होमग्राउंडवर ही सभा होणार असल्याने आता पर्यंत महाविकास आघाडीच्या झालेल्या वज्रमूठ सभांचे गर्दीचं रेकॉर्ड मोडणार का? ठाकरे गर्दी जमवण्यात यशस्वी होतील का? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या सभेमध्ये महाविकास आघाडीकडून प्रत्येक पक्षांच्या दोन नेत्यांचे भाषण होणार असल्याचा निर्णय झाला आहे. म्हणजे एकूण सहा नेत्यांची भाषण होतील. या सभेत उद्धव ठाकरे मुख्य मार्गदर्शक असणार आहेत. ही सभा उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात होत आहे. त्यामुळे ठाकरे ही सभा गाजवणार? राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाट तर काँग्रेसकडून, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि भाई जगताप आभा गाजवणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील भाषण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु यावर अंतिम निर्णय ऐनवेळी होऊ शकतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube