बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘इंग्रजी’त मिळणार सहा गुण

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘इंग्रजी’त मिळणार सहा गुण

मुंबई : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आलीय. बारावी बोर्ड (HSC Board) परीक्षेत इंग्रजी पेपरमध्ये (English paper)बोर्डाकडून झालेल्या चुकांमुळं विद्यार्थ्यांना (Students)सहा गुण मिळणार आहेत. बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये काही प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. त्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना आता सहा गुण मिळणार आहेत. बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये चुका झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर याबद्दल बोर्डानं आता मोठा निर्णय घेतलाय.

21 फेब्रुवारीला बारावीचा इंग्रजीचा पहिला पेपर झाला. या पेपरमध्ये कविता विभागात (Portry Section) प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. इंग्रजीच्या पेपरमधील तीन प्रश्नांत चुका झाल्या होत्या. या तीन प्रश्नांसाठी सहा मार्क होते. आता बोर्डानं इंग्रजी पेपरमधील चुका मान्य करत विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय. बोर्डाकडून विद्यार्थ्यांना ‘त्या’ तीन प्रश्नांसाठी एकूण सहा गुण दिले जाणार आहेत.

उद्धव ठाकरेंना इथून पुढ बोलतांना ध्यानात ठेवायचं; नवनीत राणांना सुषमा अंधारेंचा इशारा

बोर्डानं सांगितलंय की, बारावीच्या इंग्रजी पेपरमधील चुकलेले तीन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना सहा गुण दिले जातील. इंग्रजी पेपरमध्ये चुका आढळल्यानंतर त्याबद्दल बोर्डानं अहवाल जारी करण्यास सांगितलं होतं. त्यासाठी काही तज्ज्ञांची बैठक झाली. बोर्डाच्या अहवालात पेपरमध्ये चुका झाल्याचं बोर्डानं मान्य केलं. तीन प्रश्नांत चुका झाल्यात.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये ही परीक्षा झाली.

त्यातील विद्यार्थ्यांनी जर उत्तरपत्रिकेमध्ये Poetry Section-2/ Poetry / Section-2 असा उल्लेख केला असेल किंवा विद्यार्थ्यांनी Poetry Section-2 मधील अन्य कोणतेही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असेल तर तसेच त्रुटी असलेला प्रश्न क्रमांक (A-3, A-4, 4-5) उत्तरपत्रिकेमध्ये लिहिला असल्यास किंवा वरील तीन पैकी कोणत्याही एका प्रकारचं विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत लिहिलं असल्यास प्रत्येक प्रश्नाचे दोन याप्रमाणं विद्यार्थ्याला एकूण सहा गुण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube