‘लाल चिखल’कार ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ग्रामीण भागातील जीवन आपल्या लेखनीच्या माध्यमातून मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचे निधन झाले आहे.

  • Written By: Published:
Chandanshiv

मराठीतील महत्त्वाचे कथाकार, ग्रामीण साहित्य चळवळीचे सक्रिय चिंतक आणि भूमिनिष्ठ विचारक ग्रामीण भागातील जीवन आपल्या लेखनीच्या माध्यमातून मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचं निधन झालं आहे. त्यांची ‘लाल चिखल’ ही कथा महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. (Rain) त्यांच्या निधनाने साहित्यक्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

भास्कर चंदनशिव यांचे शनिवारी निधन झाले. लातूर मधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. भास्कर चंदनशिव हे त्यांच्या लेखणी प्रसिद्ध होते. भास्कर चंदनशिव हे 28 वे मराठवाडा साहित्य समेलन धाराशिवचे अध्यक्ष होते. त्यांनी राष्ट्रीय शेतकरी साहित्य संमेलनाचे देखील अध्यक्षपद भूषविले होते.

मोठी बातमी! काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यावर येणार, नुकसानग्रस्तांची भेट घेणार

भास्कर चंदनशिव यांचं खरं नाव भास्कर देवराव यादव होतं. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1945 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील हासेगाव (ता. कळंब) येथे झाला होता. भास्कर देवराव यादव हे दत्तकविधानामुळे पुढे भास्कर तात्याबा चंदनशिव या नावाने ओळखले जाऊ लागले होते. वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी लेखनास सुरुवात केली होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे कळंब येथे झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते अंबाजोगाई येथे गेले. एम.ए.ची पदवी मिळवण्यासाठी ते छत्रपती संभाजी नगर येथे गेले होते.

1972 मध्ये वरिष्ठ महाविद्यालयात मराठी प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. 2005 साली बलभीम महाविद्यालय, बीड येथून ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी कळंब येथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल राज्य पातळीवरही घेण्यात आली. ते काही काळ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य होते.

भास्कर चंदनशिव यांना आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आचार्य अत्रे पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशनचा ग्रामीण साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमयनिर्मिती पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. चंदनशिव यांचे जांभळढव्ह (1980), मरणकळा (1983), अंगारमाती (1991), नवी वारुळ (1992), बिरडं (1999) हे कथासंग्रह चांगलेच गाजले. ग्रामीण जीवनातील दुष्काळ, शेतकरी जीवन, आणि सामाजिक संघर्ष यावरील त्यांचे लिखाण हृदयस्पर्शी होते.

follow us

संबंधित बातम्या