आधुनिक भारतात विकासाच्या अमर्याद संधी; मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात उपराष्ट्रपतींच मत

  • Written By: Published:
आधुनिक भारतात विकासाच्या अमर्याद संधी; मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात उपराष्ट्रपतींच मत

Vice President Jagdeep Dhankhar : आधुनिक भारतात विकासाच्या अमर्याद संधी आहेत. त्यामुळे जगभरातून गुंतवणुकीचा ओघ आहे. या संधी युवक-युवतींनी ओळखाव्यात आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे. (Dhankhar) कर्तबगार तरुणांच्या बळावर येत्या २०४७ पर्यंत म्हणजेच स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात भारत विकसित देश म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केला. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते.

हा दीक्षांत नव्हे, शिक्षांत सोहळा आहे, याची जाणीव ठेवा. शिक्षण हे आयुष्यभर सुरूच राहणार आहे, हे लक्षात ठेवून जीवनात सातत्याने ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. माजी विद्यार्थी म्हणून विद्यापीठाच्या विकासात योगदान द्यावे. भारतात प्रगतीच्या अनेक संधी असल्याने जगाचे लक्ष आपल्याकडे आहे. विद्यापीठाने या संधी विद्यार्थ्यांपर्यंत पोचवाव्यात.

धक्कादायक! पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या जेवणात आढळल्या अळ्या, विद्यार्थ्यांमध्ये संताप

राज्यपाल यांनी दीक्षांत संदेश दिला. ते म्हणाले, की जीवनातील विविध क्षेत्रांत यशस्वी होण्यासाठी आज तुम्हाला पदवी प्रदान करण्यात येत आहे. आपल्या शिक्षणाचा आणि त्यातून प्राप्त ज्ञानाचा देशाच्या विकासासाठी, समाजाच्या भल्यासाठी उपयोग करावा. कुलगुरू डॉ. फुलारी यांनी प्रास्ताविक केले. तर, सूत्रसंचालन डॉ. मुस्तजीब खान यांनी केले.

कार्यक्रमापूर्वी उपराष्ट्रपतींच्या हस्ते पी.एम. उषा मेरू योजनेअंतर्गत मंजूर चार इमारतींचे भूमिपूजन करण्यात आले. ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत नाट्यगृह परिसरात रोपे लावण्यात आली. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनी दीक्षांत मिरवणुकीचे नेतृत्व करत राजदंड मंचावर स्थापित केला.

विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा १३, मानव्यविद्या १३, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र ९ व आंतरविद्या शाखेतील ५ पदवीधरांच्या पदव्यांसंदर्भातील वाचन अधिष्ठाता डॉ. महेंद्र सिरसाठ, डॉ. संजय साळुंके, डॉ. वीणा हुंबे व डॉ. वैशाली खापर्डे यांनी केले. संपूर्ण समारंभात ४० विद्यार्थी व काहींचे कुटुंबीय उपस्थित होते. उपस्थिती वाढवण्यासाठी ऐनवेळी काही अधिकाऱ्यांनी धावपळ केली. नाट्यगृहात प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. कुलसचिव प्रशांत अमृतकर यांच्यासह विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिसभा सदस्य, शिक्षक, अधिकारी उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube