महात्मा गांधींच्या महारोगी सेवा समितीची 350 एकर जमीन लाटण्याचा प्रयत्न

महात्मा गांधींच्या महारोगी सेवा समितीची 350 एकर जमीन लाटण्याचा प्रयत्न

Maharogi Seva Samiti : कुष्ठरोग हा भयंकर आजार आहे. एकेकाळी भारतात हजारो कुष्ठरोग रुग्ण आढळून येत होते. बाबा आमटे (Baba Amte) यांच्यासारख्या समाजसेवकांनी या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी आणि महारोग्यांची सेवा करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी देखील 1936 मध्ये वर्धा शहरात कुष्ठरोग पीडित रुग्णांची देखभाल आणि सुश्रृषा कण्यासाठी महारोगी सेवा समितीची (Maharogi Seva Samiti) स्थापन केली. मात्र, आता ही संस्था भाजपवाल्यांच्या (BJP) निशाण्यावर आली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे संस्थेजवळ असलेली 350 एकर जमीन. संस्थेकडे वर्धा शहराला लाागून नागपूर रोडवरील दत्तपूर येथे 90 एकर आणि 40 किमी अंतरावरील सेलडोह येथे 260 एकर जमीन आहे. ही जमीन बळकावण्याचे प्रयत्न सध्या भाजपवाल्यांकडून रामजी शुक्ला (Ramji Shukla)नामक इसमामार्फत सुरू आहेत. (Attempt to grab the land of Mahatma Gandhi’s Maharogi Seva Samiti)

1930 ते 1970 पर्यंत भारतात कुष्ठरोग हा गंभीर आजार होता आणि त्याचे रुग्ण देशभरात मोठ्या प्रमाणात आढळून आले. पण त्यानंतर केंद्र सरकारने देशव्यापी कुष्ठरोग निर्मूलन मोहीम सुरू केली आणि 1970 नंतर कुष्ठरुग्णांची संख्या कमी होऊ लागली. पण याआधीच महारोगी सेवा समितीची स्थापना खुद्द महात्मा गांधींनी केली होती आणि श्रीमंत लोकांनी त्या संस्थेला वर्धा शहराजवळील दत्तपूर आणि केळझरजवळील सेलडोह येथे जमिनी दान केल्या होत्या. त्या जमिनी आजही संस्थेकडे असून संस्था या जमिनी शेतकऱ्यांना कसण्यासाठी भाडेतत्त्वावर देऊन शेती करत आहे.

‘त्या’ जाहिरातीवर बाळासाहेबांचा फोटो का नाही? मुख्यमंत्र्यांनी दिले थेट उत्तर

1970 नंतर कुष्ठरुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे, संस्थेकडे सध्या दत्तपूरमध्ये सुमारे 100 कुष्ठरुग्ण आहेत आणि त्यांना शासनाकडून 2000 रुपये मासिक अनुदान मिळते. अनुदानाचे पैसे, जमीनीचे मिळणारे भाडे आणि देणग्या यावर ही संस्था चालवली जाते. पद्मश्री मनोहर दिवाण यांनी आपले संपूर्ण आयुष्य या संस्थेसाठी समर्पित केले होते. त्यांच्यानंतर डॉ.रविशंकर शर्मा यांनी काही वर्षे संस्थेचे काम पाहिले. त्यानंतर विभा गुप्ता संस्थेच्या अध्यक्षा झाल्या आणि करुणाकरन संस्थेचे सचिव झाले; मात्र सन 2017-18 मध्ये करुणाकरन यांचे निधन झाले आणि त्यानंतर मी स्वतः सचिव आहे, असे सचिव करुणाताई फुटाणे यांनी सांगितले.

करुणाताई फुटाणे यांच्या म्हणण्यानुसार, 2018-2019 मध्ये रामजी शुक्ला नावाचा इसम अचानक वर्धा शहरात प्रकट झाला आणि त्याने पवनार येथे मित्र मिलनमध्ये सहभाग घ्यायला सुरूवात केली. यासोबतच तो विनोबाजींच्या आचार्य कुलमध्ये देखील सहभागी होऊ लागला. त्याने वकील असल्याचे सांगून या संस्थांमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने ढवळाढवळ सुरू केली. काही दिवसानंतर त्याने स्वतः महारोगी सेवा समितीचे व्यवस्थापक समितीच्या कामात ढवळाढवळ करायला सुरूवात केली. याला महारोगी सेवा समितीने विरोध केला, मात्र त्यानंतरही व्यवस्थापक म्हणून शुक्ला यांची दादागिरी सुरूच होती. त्यांच्यामागे भाजपचे लोक आहेत, असे बोलले जाते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube